Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

बांधकामचा स्थापत्य अभियंता जाळ्यात; इमारत मुल्यांकनासाठी मागितली दोन लाखाची लाच

Share

नाशिक | प्रतिनिधी 

शासकीय वसतीगृहासाठी भाडेतत्वावर देण्यात येणार्‍या इमारतीचे मुल्यांकन करण्यासाठी 2 लाख 11 हजाराची लाच स्विकारताना सार्वजनिक बांधकाम विभागाचा स्थापत्य अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. त्याने यासाठी 7 लाखाची मागणी केल्याचे समोर आले आहे.

भारत सुदाम चव्हाण असे लाचखोर अधिकार्‍याचे नाव असून तो स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून कार्यरत आहे. आज दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातून त्यास अटक करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या कुटुंबियांची एक इमारत सामाजिक न्याय विभागाच्या मागसवर्गीय मुलींच्या वसतीगृहासाठी भाडे तत्वाने देण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आला होता. परंतु यासाठी या इमारतीचे मुल्यांकन करून तसे बांधकाम विभागाचे प्रमाणपत्र देणे आवश्यक होते.

यासाठी तक्रारदाराने सार्वजनिक बांधकाम विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या संशयित चव्हाण याकडे रितसर त्याची मागणी केली होती. यासाठी वसतीगृहाचे 1 महिन्याचे भाडे 7 लाख 3 हजार रूपये होते त्या प्रमाणे तितकी रक्कम आपणास द्यावी अशी लाचेची मागणी केली होती.

अखेर तडजोडी अंती ही रक्कम 2 लाख 11 हजार रूपये ठरली होती. तक्रार दाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला होता. त्या प्रमाणे खात्री करून आज पंचासमक्ष सापळा रचला होता. आपल्या कार्यालयात लाचेची रक्कम स्विकारताना पथकाने त्यास अटक केली. विशेष म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा जनजागृती सप्ताह सुरू असून या दरम्यानच ही कारवाई झाल्याने सकारात्मक चर्चा परिसरात होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!