Type to search

Breaking News आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

‘… आता निवडणुकीत नाशिककर तुमचे फटाके फोडतील’

Share

देशदूत डिजिटल वृत्त

नाशिक, ता. २२ : आज सकाळी उशिरा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे अधिकृत पत्र महापालिकेत प्राप्त झाले. त्यानंतर साडेबाराच्या सुमारास आयुक्त तुकाराम मुंढे कार्यभार सोपविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले.

मात्र त्यांची पाठ फिरताच मनपा भवनाच्या शेजारीच असलेल्या महापौरांच्या रामायण निवासस्थानासमोर सात ते आठ उत्साही कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला. ही घटना तेथे उपस्थित असलेल्या अनेक माध्यमप्रतिनिधींनी कॅमेऱ्यात कैद केली.

दरम्यान हे वृत्त प्रसिद्ध होताच आधीच मुंढेंच्या बदलीने संतप्त झालेले नाशिककर अधिकच संतप्त झाले. त्यांनी सत्ताधारी भाजपा आणि महापौरांवर आपला सारा रोष प्रकट केला.

अनेकांनी ‘शेम शेम बीजेपी ’ अशा प्रतिक्रिया सोशल माध्यमांवर व्यक्त केल्या.

इंजिनियर पंकज गवळी म्हणातात की ठिक आहे हा तुमचा शेवटचा जल्लोष समजा, निवडणुका फार दूर नाहीत. त्यावेळेस तुमच्याकडे बघून घेऊन. लोकांना तुकाराम मुंढे हवेत भाजपा नव्हे.

अनिकेत कोंडवे यांची प्रतिक्रिया संतप्त आहे. ते म्हणतात, ‘आता विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत नाशिककर तुमचे फटाके फोडतील’.

अमोल सोनवणे यांनी महापौर रंजना भानसी यांना थेट लक्ष करत तुमचे तर डिपॉझिट जप्त होईल पुढच्या निवडणुकीत अशी प्रतिक्रिया दिली आहे.

रवि कुडाळ म्हणतात की नाशिककरांनी नेहमी सहनशीलतेने राजकारण्यांना उत्तर दिले आहे, हवे तर मनसे ला विचारा.

ज्योती चव्हाण यांनी, यालाच म्हणतात पार्टी विथ डिफरन्स अशी उपरोधिक प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या तीन वर्षात नाशिकमध्ये चार आयुक्त बदलले गेले हे राजकारण्यांना नक्कीच भूषणावह नाही. नाशिक महापालिकेत जे नगरसेवक निवडून आले आहेत, त्यातील अनेकांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. मात्र अशा लोकांचे ऐकून मुख्यमंत्र्यांनी मुंढेंसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांची बदली केली, हे म्हणजे त्यांनी गुन्हेगारांसमोर नांगी टाकली. महापौर बंगल्याबाहेर भरदिवसा फटाके फोडले जातात हे म्हणजे नाशिकचे बिहार झाल्याची स्थिती आहे.

नितीन शुक्ल- आम आदमी पार्टी, नाशिक

महेश पाटील यांनी, ‘लाजेने झुकला लोकशाहीचा माथा, अखेर गोदावरीत बुडालीच तुकारामाची गाथा’ अशी खेदजनक प्रतिक्रिया दिली आहे.

सौरभ कुलथे यांनी, ‘ काय हो? यांना दिवसा फटकेबंदीचा नियम लागू होत नाही का? अशी प्रतिक्रिया देऊन कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष वेधले आहे.

विजय चव्हाण यांनी, ‘सगळ्यांचे लोनचे हप्ते आता भरले जातील’ अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे.

तुकाराम मुंढे हे शहरातील भुसंपादन आणि करोडोंचा घोटाळा लवकरच उघड करणार होते, त्यामुळे त्यांना घालविले अशी प्रतिकिया प्रीतम भामरे यांनी दिली आहे.

मुंढेंच्या बदलीनंतर आम्ही रस्त्यावर उतरलो नसलो, तरी एक दिवस तुम्हाला मात्र रस्त्यावर नक्कीच आणू अशी प्रतिक्रिया आदित्य मराठे यांनी दिली आहे.

दरम्यान हे तुकाराम मुंढेंच्या बदलीचे, त्यानंतर नाशिककरांनी केलेल्या आंदोलनाचे आणि दुपारी फटाके फोडल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच नाशिककर नागरिकांसह बाहेरील जिल्ह्यातील नागरिकांनीही सोशल मीडियावर संताप व्यक्त केला.

अवघ्या तासाभरातच २० ते २५ हजार नाशिककरांनी या वृत्तावर प्रतिक्रिया नोंदविल्या.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!