Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

छबू नागरे शिवसेनेत; खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन

Share

नाशिक । प्रतिनिधी 

नोटाबंदीच्या काळात बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी अडचणीत सापडलेले राष्ट्रवादीचे तत्कालीन  पदाधिकारी छबु नागरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि.5) त्यांनी शालिमार येथील मध्यवर्ती कार्यालयात शिवबंधन बांधले आहे.

शिवसेना नेते राऊत  दोन दिवस नाशिक दौर्‍यावर  होते.  गुरुवारी शहरातील विविध प्रभागांमध्ये विकासकामांचे भूमिपुजन आणि लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान, राऊत यांनी राष्ट्रवादीचे माजी युवक अध्यक्ष छबु नागरे यांना शिवसेनेत घेऊन अनेकांना बुचकळ्यात टाकले आहे. नोटाबंदीच्या काळात बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी नागरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.

यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!