Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

बापरे! पाच महिन्यांत मध्य रेल्वेला फुकट्या प्रवाशांकडून मिळाले १०० कोटी

Share

नाशिक | प्रतिनिधी 

विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून वसूल करण्यात आलेल्या दंडाची रक्कम गेल्या पाच महिन्यांत मोठी वाढ झाली आहे. मुंबई, भुसावळ, सोलापूर, पुणे आणि नागपूर विभागात केलेल्या कारवाईतून जवळपास १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक दंड फुकट्या प्रवाशांकडून वसूल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, भुसावळ विभागातून विक्रमी १७ कोटी रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देशदूतशी बोलताना दिली.

गेल्या अनेक दिवसांपासून मध्य रेल्वेमध्ये प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, प्रवाशांच्या संख्येत वाढ व्हावी यासाठी मध्य रेल्वेकडून फुकट्या प्रवाशांवर अंकुश ठेवण्याचे मोठे आव्हानच होते. ठिकठिकाणी तिकीट तपासणी करून अवैध प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आळा बसावा यासाठी ठिकठिकाणी तपासणी करण्यात येत आहेत.

यावर्षी म्हणजेच १ एप्रिल २०१९ ते २४ सप्टेंबर २०१९ या पाच महिन्यांच्या कालावधीत तिकीट तपासणीचे १९.१५ लाख प्रकरणे दाखल झाली यातून १०० कोटी रुपये दंड वसूल केला आहे. यावर्षी एकूण १०० कोटी आणि २९ लाखांचा दंडाची नोंदणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीतील रक्कम ८७.९८ लाख होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्ये १३.९९ टक्क्यांनी वाढली आहे.

यादरम्यान, तिकीट तपासणी करताना मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी सहा बनावट तिकीट तपासणीस , चार तोतया पोलीस आणि एक तोतया केटरिंग स्टाफ यांनादेखील ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.

विभागवार दंड वसूल केल्याची माहिती

मुंबई मंडळ – ८.१३ लाख प्रकरणांतून  ४१.२१ कोटींचा दंड वसूल

भुसावळ मंडळ – २.८३  लाख प्रकरणांतून  १७.०० कोटींचा दंड वसूल

नागपूर मंडळ – २.३१ लाख प्रकरणांतून  १०.४६ कोटींचा दंड वसूल

पुणे मंडळ – १.७२ लाख प्रकरणांतून  ८.७९ कोटींचा दंड वसूल

सोलापूर मंडळ – २.७० लाख प्रकरणांतून १२.९५ कोटींचा दंड वसूल

मुख्यालय स्क्वाड – १.४५ लाख प्रकरणांतून ९.८८ कोटींचा दंड वसूल

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!