Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : रेल्वे कर्मचाऱ्याला निवडणूक प्रचार भोवला; शिस्तभंगाची कारवाई

Share

नाशिक | प्रतिनिधी 

लोकसभा निवडणुकीत प्रचार करणाऱ्या मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई रेल्वेकडून करण्यात आली आहे. जितेंद्र जाधव असे या कर्मचाऱ्याचे नाव असून तो नाशिक येथे मुख्य पार्सल क्लार्क म्हणून काम करतो. केंद्र सरकारी सेवेत म्हणजेच रेल्वेत सेवेत असताना लोकसभा निवडणुकीत त्याने एका पक्षाचा प्रचार केल्याची घटना समोर आली होती. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवता सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची दाट शक्यता असल्यामुळे त्यांचे धाबे दणाणले आहे.

अधिक माहिती अशी की, जितेंद्र जाधव नामक मुख्य पार्सल क्लार्क नाशिक येथे मध्य रेल्वेत कार्यरत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवाराचा प्रचार करत असताना निदर्शनास आले होते. तेव्हापासून जाधव यांच्यावर कारवाईचा बडगा कायम होता.

जाधव निवडणुकीत प्रचार करत असल्याचे निदर्शनास येताच नाशिक जिल्हा निवडणूक विभागाकडून जाधव यांची तक्रार रेल्वे खात्यात केली होती. तेव्हापासून जिल्हा प्रशासनाकडून या घटनेचा पाठपुराव करण्यात येत होता. अखेर गेल्या आठवड्यात या कर्मचाऱ्यावर भुसावळ विभागाच्या वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधकांनी शिस्तभंगाची कारवाई केली आहे.

निवडणूक काळात कुठल्याही सरकारी कर्मचाऱ्याला राजकीय पक्षाचा प्रचार करता येत नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा असून निवडणूक आयोगाची अशा कर्मचाऱ्यांवर वॉच राहणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!