Type to search

Breaking News Featured maharashtra आवर्जून वाचाच मुख्य बातम्या हिट-चाट

कलाकारांचा गणेशोत्सव : बाप्पासोबत माझं नातं शब्दांत व्यक्त करता येणार नाही – राहुल पेठे

Share

बाप्पासोबतचं माझं नातं शब्दांत व्यक्त करताच येणार नाही. माझ्या चांगल्या- वाईट अशा सगळ्याच प्रसंगामध्ये बाप्पा माझ्या पाठीशी असतोयाचा मला ठाम विश्वास आहे. बाप्पाकड़ून मिळणारी ऊर्जा आणि सकारात्मकता माझ्यासाठी नेहमीच खास असते. आमच्या घरी साधारण ६०-७० वर्षांपासून किंवा त्याच्याही आधीपासून गणेशोत्सव साजरा केला जातो.

आमच्याकडे दीड दिवसांचा गणपती असतो आणि वर्षानुवर्षं शिवरेकर पद्धतीचीच मूर्ती आणली जाते. मुळात आमचे सगळे कुटुंबीय एकाच बिल्डिंगमध्ये राहात असल्याने,गणेशोत्सव एकदम जल्लोषात साजरा केला जातो. आधी आम्ही एकाच्या घरी जमतोत्यांच्याकडे आरती करतो मग दुसरीकडे मग तिथून पुढच्या घरी आरती.

असं आमचं सुरूच असतं. वेगळीच मजा असते. एकमेकांकडे नैवेद्यासाठी जातो. या दीड दिवसांत आमच्या सगळ्यांच्याच घराचे दरवाजे उघडे असतात. या काळात एखाद्याला शोधणंम्हणजे कठीण काम असतं. कधी कधी असं वाटतंदीड दिवस खूपच कमी आहेत. इतके पटकन हे दिवस संपतात.

आधी गणपती येणार म्हणून खूप उत्साह असतो आणि विसर्जनाच्या दिवशी मात्र खूप वाईट वाटते. लहानपणापासूनच मला गणेशोत्सवाचे खूप आकर्षण होते. शाळेत असताना तर विसर्जनाच्या दिवशी मला खूप रडू यायचे. तासनतास मी गणपतीसमोर बसून त्याला न्याहाळत बसायचो. आजही मी अनेकदा गणपतीच्या लोभस मूर्तीकडे बघत बसतो.

बाप्पाच्या डोळ्यांतील प्रेमळ भावाचे मला नेहमीच आकर्षण राहिले आहे. आमच्याकडे पूर्वापार शाडूचीच मूर्ती आणली जाते आणि मागील १५-१६ वर्षांपासून आम्ही विसर्जनही गच्चीत मोठ्या टबमध्ये करतोज्याने पर्यावरणाचेही संतुलन राखले जाते. नेहमीप्रमाणे  यंदाचा गणेशोत्सवही माझ्यासाठी खासच असेल. माझ्या मनाचे श्लोक‘ या चित्रपटाचे शूटिंग आता जवळपास संपत आले आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सव‘ साजरा करण्यासाठी मी बऱ्यापैकी निवांत आहे. त्यामुळे हा गणेशोत्सवही मी अगदी उत्साहात साजरा करेन.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!