Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : महिलेने फोडला चोरट्याला घाम; ग्राहक सेवा केंद्रातील थरार सीसीटीव्हीत कैद

Share

नाशिक | प्रतिनिधी

भरदिवसा चोरटा स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात शिरला. यावेळी केंद्रात असलेल्या एकट्या महिलेने न घाबरता प्रतिकार केला. महिलेने चोरट्याला घामाघूम करून सोडले मात्र, यावेळी याठिकाणी कोन्हीही न आल्यामुळे चोरटा पसार होण्यात यशस्वी ठरला.

महिलेने चोरट्याशी केलेले दोन हात चा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. संपूर्ण व्हिडीओ बघितल्यानंतर पोलिसांनीदेखील आश्चर्य व्यक्त केले. दरम्यान, महिलेने दाखवलेल्या धाडसाबाबत नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी महिलेचे कौतुक केले आहे.

शहरातील अशोकनगर परिसरात स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात भरदिवसा हा प्रकार घडला. सविता मुर्तडक असे या धाडसी महिलेचे नाव आहे.

चाकूधारी चोर आणि सविता मुर्तडक यांच्यात पाच ते सात मिनिट झटापट झाली. महिलेने स्वतःचा जीव वाचवत चोरट्याला केंद्रातून निघू दिले नाही.

महिलेचा रुद्र अवतार पाहून चोरटाही घामाघूम झाला होता. दोन ते तीन वेळा महिलेने या चोरट्याला ओढून आणले. दरवाजाची कडी उघडून पळून जात असताना त्याला पुन्हा केंद्रात ओढून आणले. मात्र, चाकूचा धाक दाखवत चोरटा पळून जाण्यात यशस्वी ठरला.

गुन्हेगारीवर अंकुश गरजेचा

नाशिक शहरात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. सोनसाखळी चोरी, घरातील मुद्देमालाची चोरी अशा घटना रोजच घडत आहेत. यामुळे शहरातील नागरिक चोरट्यांच्या दहशतीखाली आहेत. वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी नाशिक पोलिसांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याची मागणी वेळोवेळी नागरिकांकडून केली जात आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!