Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

अर्ज माघारीसाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण; आज स्पष्ट होणार प्रमुख लढती

Share

नाशिक | प्रतिनिधी 

विधानसभा निवडणूक उमेदवारी अर्ज माघारीची आज (दि.7) दुपारी तीन वाजेपर्यंत अंतिम मुदत आहे. शहरासह जिल्ह्यातील 15 मतदारसंघांत बंडोबांनी दंंड थोपटले असून संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष या बंडोबांकडे लागून आहे.

काल दिवसभर शिवसेना, भाजप व राष्ट्रवादीतील बंडोबांना थंड करण्यासाठी पक्षपातळीवरून मनधरणी सुरू होती. पक्षाच्या आदेशानंतर बंडखोर पांढरे निशाण फडकवतील की, निवडणूक लढविण्यावर ठाम राहतील याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

जिल्ह्यातील 15 मतदारसंघासाठी 231 अर्ज वैध ठरले आहेत. युती व आघाडीत जागा वाटपात अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत अनेकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

नाशिक पश्चिमची जागा सेनेला न सुटल्याने या ठिकाणी नगरसेवक सुधाकर बडगुजर, विलास शिंदे व मामा ठाकरे यांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे भाजप उमेदवार सीमा हिरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे, तर नाशिक पूर्वची जागा आघाडीने कवाडे रिपाइं गटाला सोडली आहे.

मात्र, ऐनवेळी भाजपाने तिकीट कापल्याने बाळासाहेब सानप यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांना पक्षाने एबी फॉर्म दिला. सानप यांनी राष्ट्रवादीकडून अर्ज भरला; तर कवाडे गटाकडून गणेश उन्हवणे यांनी अर्ज दाखल केला आहे.

या जागांवर कोण माघार घेते याकडे लक्ष लागून आहे; तर नाशिक पश्चिममध्ये सेना नगरसेवकांनी भरलेले अर्ज मागे घ्यावे, असे आदेश पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरुन देण्यात आले आहे. मात्र, बडगुजर व ठाकरे माघार घेतील व विलास शिंदे हे उमेदवारी करतील, अशी चर्चा आहे.

तसे, झाल्यास सेना व भाजपच्या मतांचे विभाजन होईल. युतीत नांदगावची जागा शिवसेनेला सुटली आहे. मात्र, त्यामुळे नाराज झालेल्या भाजपच्या जि.प.बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. रविवारी दिवसभर बंडोबांना थंड करण्यासाठी पक्षपातळीवरुन प्रयत्न सुरू होते. त्यामुळे या प्रयत्नांना आज यश मिळेल का याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!