Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

राजकीय धूळवडीचा महागुरूवार; उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड

Share

नाशिक | प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी म्हणजेचा आज (बुधवारी) जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा धडाका उमेदवारांनी लावला होता. आज सकाळपासून अधिकृत उमेदवारी जाहीर केलेल्या उमेदवारांची गर्दी बघायला मिळाली होती.

काहींना पक्षाने उमेदवारी नाकारली, मात्र त्यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. काहींच्या समजुती काढण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले तर काहींचे अजूनही उमेदवारी नाकारल्याने तळ्यात मळ्यात सुरु आहे. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. यादरम्यान, जी काही उलथापालथ होईल ती उद्याच होणार असल्याचे दिसते आहे.

देवळाली मतदार संघातील शिवसेना भाजपा आरपीआय व महायुतीचे अधिकृत उमेदवार योगेश बबनराव घोलप यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी रेणुका माता मंदिर येथे महाआरती करून देवीचे दर्शन घेऊन अर्ज भरण्यासाठी गेले.

इगतपुरी शिवसेनेच्या उमेदवार निर्मला गावित यांनी छगन भुजबळांचे चरणस्पर्श केल्यानंतर गावितांना आशीर्वाद देत भुजबळ म्हणाले हिरामण खोसकर व तुमच्यात मैत्रीपूर्ण लढत होऊ दया. भुजबळ हे हिरामण खोसकर यांचा अर्ज भरण्यासाठी भुजबळ आले होते. यावेळी कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

तर तिकडे मालेगाव येथे काँग्रेस आघाडीतर्फे आमदार आसिफ शेख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्या  समवेत महापौर शेख रशीद , ताहेरा शेख ,असलम अन्सारी यांची उपस्थिती होती.

मालेगाव मध्यमधून एम आय एम तर्फे माजी आमदार मौलाना मुफ्ती मो इस्माईल यांनी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासमवेत एजाज बेग, युसुफ इलियास , मुस्तकीन डिग्नेटी यांची उपस्थिती होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!