Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

अकोले : रस्त्यांची दयनीय अवस्था; बसचे नियंत्रण सुटल्याने अपघात; ७० प्रवासी बचावले

Share

अकोले | प्रतिनिधी

संगमनेर आगाराची बस कसाऱ्याकडे जात असताना भंडारदरा कॉलनी वसाहत प्रकल्प येथे झालेल्या अपघातात 70 प्रवासी सुखरूप बचावले आहेत. अकोले तालुक्यातील रस्त्याची स्थिती अत्यंत वाईट झाल्यामुळे हा अपघात झाला आहे.

संगमनेर आगाराची बस क्रमांक क्रमांक एम.एच 14 बीपी 3830 क्रमांकाची बस आज सकाळी कसाऱ्याकडे निघाली असता , सकाळी 8.30वा भंडारदरा कॉलनीच्या परिसरात समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला.

अकोले तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येते आहे. या बसचे चालक ए.सी. कोरडे यांच्या दक्षतेमुळे 70 प्रवाशांचे प्राण वाचले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!