शाओमीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत

0

नवी दिल्ली | प्रतिनिधी

शाओमीने रेडमी नोट ७ आणि रेडमी नोट ७ प्रो लाँच केल्यानंतर आता सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत शओमी आहे.

शाओमीचा पुढील आठवड्यात शाओमी ‘रेडमी गो’ हा स्मार्टफोन लाँच करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीच्या सूत्रांकडून मिळाली आहे. १९ मार्च रोजी दिल्लीत एका कार्यक्रमात हा फोन लाँच करणार असून सर्वात कमी किंमतीचा स्मार्टफोन म्हणून याकडे बघितले जाणार आहे.

‘रेडमी गो’ चीनमध्ये लाँच करण्यात आलेला आहे. शाओमीचा हा अँड्रॉयड गो स्मार्टफोन आहे. अँड्रॉयड गो हा ऑरियोचा लाइट व्हर्जन मानला जात आहे. चीनमध्ये लाँच करण्यात आलेल्या या फोनमध्ये १ जीबी रॅम ८ जीबी इंटरनल स्टोरेजसह स्नॅपड्रॅगन ४२५ प्रोसेसर देण्यात आला आहे.

तसेच ८ मेगापिक्सलचा रिअर आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची किंमत ३ हजार ४९९ रुपये इतकी आहे. हा फोन लाँच ऑफरसह आणखी स्वस्त किंमतीत लाँच होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

*