Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

ठाण्यात सेप्टीक टँकमध्ये गुदमरुन 3 जणांचा मृत्यू तर 5 जण जखमी

Share

मुंबई | प्रतिनिधी

सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील सेप्टीक टॅंकमध्ये गुदमरुन 3 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत इतर 5 जणांना वाचविण्यात यश आले असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.

ढोकाळी येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील सेप्टीक टँकमध्ये 8 जण अडकल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या. 8 जणांचे जीव वाचविण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु झाले, मात्र दुर्दैवाने यातील 3 जणांचा मृत्यू झाला.

मृतांमध्ये अमित पुहाल (वय 20), अमन बादल(21), अजय बुंबाक (वय 24) या तिघांचा समावेश आहे. तर विरेंद्र हतवाल (वय 25), मनजित वैद्य (वय 25), जसबीर पुहाल(वय 24), रुमेर पुहाल (वय 30) आणि अजय पुहाल(वय 21) या पाच जणांना वाचविण्यात यश आले आहे.

या पाचही जणांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!