Type to search

Breaking News Featured maharashtra नाशिक मुख्य बातम्या

कांद्याच्या पैशांची मनीऑर्डर पाठवणाऱ्या शेतकऱ्याची ‘पीएमओ’कडून दखल

Share

निफाड | नाशिक जिल्ह्यातील आणि निफाड तालुक्यातील नैताळे येथील शेतकऱ्याने दीडशे रुपये प्रती क्विन्टल कांद्याला दर मिळाल्यामुळे संतापात पंतप्रधान कार्यालयात स्वत:च्या खिशातले ५३ रुपये खर्च करून १०६४ रुपयांची मनीऑर्डर पाठवली होती. मनीऑर्डर प्राप्त झाल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाकडून गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत तपास करण्याच्या सूचना दिल्याआहेत .

अधिक माहिती अशी की, नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी साठे यांनी कांद्याला केलेल्या खर्चाचा रुपयाही निघाला नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्याने याबाबत थेट पंतप्रधानांनाच तक्रार करण्याचे ठरवले. त्यानंतर त्यांनी कांद्याच्या पैशातून मनीऑर्डर केली. मनीऑर्डर केल्याची वार्ता सर्वत्र पसरल्यानंतर माध्यमांमध्येही सर्वत्र चर्चा रंगली होती.

याच मनी ऑर्डरची दखल आता पीएसओ ऑफिसने घेतली आहे. कांदा प्रश्नी पंतप्रधानांनी नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती मागितली आहे.
कांद्याला 100 ते 200 रुपये क्विंटल भाव मिळत असल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकरी मोठे अडचणीत आहेत. कांद्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलनं झाली. कांद्याचे भाव घसरल्यामुळे शेतकरी मोठा अडचणीत आला होता. पण आता यावर काय तोडगा निघणार सर्वांचे लक्ष लागून आहे .

यामुळे साठे यांना उचलावे लागले पाऊल

साठे यांनी सात क्विंटल कांदा बाजारात नेला. 151 रुपये प्रति क्विंटल दराने १०६४ रुपये आले. कांदा वाहनात भरण्यासाठी ४०० रुपये मजुरी लागली. गाडीभाडे म्हणजेच वाहतूक खर्च ७०० रुपये आला. ११०० रुपये निव्वळ कांदा मार्केटमध्ये नेण्याचा खर्च आला. चार महिने तळहातावरील फोडाप्रमाणे काळजी घेतली. काबाड कष्ट केले. लावणीचा खर्च, निंदणी, फवारणी, कांदा काढणीचा खर्च याच तर हिशोबच नाही. यामुळे नैराश्यात न जाता शेतकऱ्यांचे सरकार म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींनाच मनीऑर्डर केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!