Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

निवडणूक पोलिस निरीक्षकांनी घेतला वॉर रुमचा आढावा

Share

नाशिक | प्रतिनिधी 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 अनुषंगाने मतदानाच्या आदल्या दिवशी व प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी प्रसिध्दी माध्यम व सोशल मिडीयाद्वारे प्रसारित होणाऱ्या मतदान प्रक्रियेबाबत बातमी व तक्रारींवर देखरेख ठेवण्यासाठी तयार करण्यात ‘वॉर’ रुमचा आढावा निवडणूक पोलिस निरीक्षक योगेश चौधरी विजय शर्मा यांनी घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, अपर जिल्हाधिकारी निलेश सागर, उपजिल्हानिवडणुक अधिकारी कुंदन सोनवणे, मनपाचे उपायुक्त (कर) प्रदीप चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी हेमंत अहिरे, जिल्हा विधी अधिकारी हेमंत नागरे, बीएसएनएलचे श्री.बर्वे उपस्थित होते.

श्री.मांढरे यांनी, विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रावरील हालचालींवर जिल्हा प्रशासनाचे लक्ष असून ‘वॉर’ रुमच्या माध्यमातून वेब कास्टींगद्वारे बारीकसारीक घडोमोडींवर लक्ष ठेवण्यासह अनुचित प्रकार टाळण्यासही मदत होणार आहे.

जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघामधील 4 हजार 579 मतदान केंद्रांपैकी सुमारे 450 केंद्रे वेबकास्टिंगद्वारे जोडण्यात आली असल्याची माहिती त्यांनी यावेळी पोलिस निरीक्षकांना दिली.

तसेच वॉर रुममध्ये टीव्ही स्क्रीन लावण्यात आलेल्या विविध चॅनल्सचे प्रक्षेपणही पाहिले जाणार आहे. या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीमधील तथ्य तपासले जाईल. तसेच त्यामध्ये विसंगती आढळली तर अचूक माहिती देण्याचे काम प्रशासनाकडून केले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मशिनमध्ये बिघाड किंवा अन्य गोष्टी घडल्या तर त्याबाबतचा पाठपुरावा करुन तत्काळ या वॉर रुममधून संबंधित यंत्रणेला सूचना करण्यात येणार असल्याची माहिती श्री. मांढरे यांनी पोलिस निरीक्षकांना दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!