Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू; लोकप्रतिनिधी ऐन दिवाळीत पाहणी दौऱ्यावर

Share

नाशिक | प्रतिनिधी 

सततच्या पावसाने नुकसानग्रस्त द्राक्षबागांना आज दिंडोरी-पेठ विधानसभा मतदार संघाचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी पाहणी दौरा करुन परिस्थिती समजुन घेतली. द्राक्षपीकासह सर्वच पीके या पावसाने संकटात आली असुन तात्काळ पंचनामे करण्यात यावे असे आदेश देणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

राज्यासह दिंडोरी तालुक्यात सतत पाऊस हजेरी लावत आहे. या पावसामुळे द्राक्षबागांसह सर्वच शेतपीकांचे नुकसान होत आहे. यात प्रामुख्याने द्राक्षबागांमध्ये प्रचंड चिखल साचला असुन बागांमध्ये प्रतिबंधात्मक पावडर फवारणीसाठी ट्रॅक्टर फिरवणे देखील अशक्य झाले आहे. तसेच सतत गाळ साचल्यामुळे द्राक्षझाडांच्या मुळांमार्फत मिळणारे आवश्यक घटक बंद झाल्यामुळे झाडांच्या वरच्या बाजुला मुळं फुटण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे सुमारे ८०% खर्च करुन सुद्धा द्राक्षबागा संकटात सापडल्यामुळे द्राक्ष उत्पादक हवालदिल झाला आहे.

याच पार्श्वभुमीवर आज आमदार झिरवाळ यांनी दिंडोरी तालुक्यातील तिसगाव शिवारातील अशोक माधवराव भालेराव, अमोल शिवाजी भालेराव तसेच तळेगावं वणी शिवारातील वसंत सरोदे, चंद्रकांत सरोदे, बाळासाहेब सरोदे, संजय सरोदे, विष्णु सरोदे आदी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांना भेट दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, डाॅ. योगेश गोसावी, शरद महाले, नितीन भालेराव, रोशन ढगे, अविनाश ढगे, जमीर शेख आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.


नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या शेतमालाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या- आमदार सरोज आहिरे

नाशिक तालुक्यात देवळाली मतदार संघात परतीच्या पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकर्‍यांच्या पिकांची गिरणारे .दुगाव . वाडगाव . मुंगसरा या भागात संदिप दामोदर पिंगळे . शिवाजी आण्णा पिंगळे . मातोरी . अशोक नाना वायचळे . मुंगसरा . भास्करराव निमसे . गिरणारे . दत्तात्रय थेटे . पुंडलक पाटील . व देवळाली मतदारसंघातील इतर शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसानीची पाहानी दौरा केला . तात्काळ पंचनामे करून त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे जिल्ह्यातील नाशिक, त्र्यंबकेश्‍वर, इगतपुरी यासह जिल्हाभरात अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याचे आ. सरोज आहिरे यांनी सांगीतले.

नाशिक, तालुक्यातील हजारो एकरावरील द्राक्षाचे पीक धोक्यात आले आहे.फुलोरा अवस्थेतील बागा संकटात सापडल्या आहे . नाशिक इत्यादी तालुक्यातील शेतात पाणी साचल्यामुळे शेतातील मका, बाजरी, सोयाबीन, कपाशी, कांदे, कांद्याचे, रोप, टोमॅटो,भुईमूग इत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.शेतात उभ्या असलेल्या पिकांसोबतच काढून ठेवलेले पीक सुदधा वाया गेले आहे.

दिवाळी सणाच्या कालावधीत पावसाने जोर धरल्यामुळे शेतातील तयार पिके काढता येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. सततच्या पावसामुळे शेतातील मका आणि बाजरीचा चारा सुद्धा सडून गेल्यामुळे चाऱ्याचा सुद्धा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.मका सोयाबीन या पिकांना कोंब फुटले आहे.जिल्ह्यात कांदा या नगदी पिकाचे सुद्धा नुकसान झाले आहे. कांद्याच्या रोपांसह शेतात लागवड केलेला कांदा सडून चालला आहे. शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत तात्काळ द्यावी अशी मागणी आमदार अहिरे यांनी केली.


सिन्नर तालुक्यात नुकसान

तालुक्यांतील विंचूरी पांढुर्ली व आजूबाजूच्या परीसरातील अतीवृष्टी मुळे झालेल्या सोयाबीन व द्राक्ष बागेची नूसकानीची पहानी करतांना खासदार हेमंत गोडसे यांनी -प्रशासनाला तातडीने पंचनामे करून शासनाला अहवाल पाठवा असे आदेश दिले.

सिन्नरच्या पूर्व भागातील वावी, पिंपरवाडी परिसरात सोमवारी सायंकाळी वादळी पावसाने कपाशी पिकाचे मोठे नुकसान केले आहे. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने कपाशीची भरलेली झाडे तुटून शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. याशिवाय गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने बाजरी, सोयाबीन, भुईमूग या पिकांना देखील फटका बसला आहे.

कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागात शेती पिकांचे पंचनामे करून भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!