पाणी समृद्धीतून विकास साधावा – सत्यजीत भटकळ

0
नाशिक | प्रतिनिधी
देशात खूप सारे प्रश्न आहेत, आणि प्रत्येक प्रश्नाला उत्तर शोधणारी माणसं आपणास आढळून येतात. पण त्या उत्तराच सार्वजनिकीकरण होताना दिसत नाही. पानी फाउंडेशनच्या माध्यमातून गावात पाणी निर्माण होत आहे, त्यातून गावात समृद्धी कशी आणता येईल यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ते करताना निसर्ग, जमीन नद्या यांचे संतुलन बिघडणार नाही याची काळजीदेखील घेणे आजच्या घडीला गरजेचे आहे. गावे समृद्ध कशी होतील यासाठी पुढे काम करणार असून पाण्याची टंचाई भरून काढून पाण्यातून पैसा कसा निर्माण होईल यावरदेखील काम करायचे असल्याचे प्रतिपादन सत्यजीत भटकळ यांनी केले.
ते फार्मर प्रोड्युसर कंपनी सह्याद्री फार्म येथे शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. यावेळी संचालक विलास शिंदे यांनीही कंपनीच्या उभारणीतील शेतकऱ्यांचा सहभाग विषद केला. ते म्हणाले,  ज्या पिकांमध्ये यांत्रिकीकरणाला जास्त वाव नाही. मजूर अथवा मानवी हस्तक्षेप असणाऱ्या पिकांमध्ये काम हळू असलेल्या कामांची करणे आवश्यक आहे. यातून बेरोजगारी पण कमी होण्यास मदत होऊ शकते आणि कृषी क्षेत्रात चांगले बदल होऊ शकतात.
बियाण्यांच्या लागवडीपासून ग्राहकांपर्यंत तो माल पोचेपर्यंत सगळी व्यवस्था जे शेतकऱ्यांच्या माध्यमातून उभी राहिली तरच जो नफा आहे तो शेतकऱ्याला मिळू शकतो. शेती हा एक फायदेशीर उद्योग म्हणून पाहणे गरजेचे आहे. काही पर्याय नाही म्हणून आपण शेतीकडे आज पाहतो आहोत, पण शेती हा एक फायदेशीर उद्योग म्हणून त्याकडे पाहणे गरजेचे असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
मोहाडी क्लस्टरमधील ग्रामस्थांशी यावेळी सत्यजित भटकळ यांनी संवाद साधला. मोहाडी क्लस्टर अंतर्गत चालू असलेल्या कामांची माहिती त्यांनी जाणून घेतली .निळवंडी येथील शेतरस्ते उभारणीचे त्यांनी विशेष कौतुक केले. पानी फाउंडेशनच्या माध्यमातून चालू असलेल्या कामाची माहिती यावेळी ग्रामस्थांसोबत चर्चा केली .या प्रसंगी प्राचार्य विलास देशमुख, श्रीकृष्ण गांगुर्डे, संदीप शिंदे, अंबादास कदम, सोपान संधान क्लस्टर मधील सरपंच, उपसरपंच आणि शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या एकजुटीचे कौतुक 
सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी उभ्या केलेल्या कामाने सत्यजित भटकळ भारावून गेले. सह्याद्री आणि पानी फाउंडेशन च्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपनी तयार करून त्यासाठी लागणार सुविधा उपलब्ध करून एक ग्रामीण भागातील तरुणांची फळी कशी निर्माण करता येईल यासाठी काम करण्याचे त्यांनी सांगितली.

LEAVE A REPLY

*