Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत ‘स्वच्छ भारत’ला हरताळ

Share
पिंपळगाव बसवंत | प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला जाताना पाण्याची बाटलीही घेऊन जाण्यास परवानगी नव्हती. सभा संपली आणि सर्वांनी पाण्यासाठी धावाधाव केली. यादरम्यान वेगळेच वास्तव समोर आले.

हजारो खुर्च्यांच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत भरलेल्या पाण्याच्या बाटल्या गरम होऊन पडल्या होत्या. अनेकांनी पायाने लाथाळल्या तर अनेकांनी पाणी गरम असले तरी सावलीत गार होईल व नंतर पिण्यायोग्य होईल म्हणून सोबत नेल्या.

अनेक कार्यकर्ते सुरक्षेच्या अतिरेकामुळे नाराज झाले होते त्यांनी जाता जाता अस्ताव्यस्त पडलेल्या पाण्याच्या बाटल्यांकडे बघत हे मोदी सरकारचे स्वच्छ भारत अभियान असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली.

सभास्थळी पिण्याच्या बाटल्यांना मज्जाव केल्यामुळे नागरीकांनी समवेत आणलेल्या बाटल्या कुठेही टाकून दिल्या तर सभेनंतर पुन्हा बाटल्या तसेच थंडपेय, बिस्कीट मिळाले याचा कचरा तसेच रीकाम्या बाटल्यांचा माळरानावर ठिकठिकाणी अक्षरश: खच पडला होता.

तर अनेकांकडून पोलीसांनी बाटल्या जप्त करून तपाणीच्या ठिकाणी बाजूलाच फेकल्याचे दिसत होते. सभेसाठी आणण्यात आलेले पंतप्रधानांचे मुखवटे, चिन्हाचे प्रतिरूप, बॅनर या हे सर्व सभेनंतर इतस्थ फेकण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी मोहीम म्हणजे स्वच्छ भारत मोहीम परंतु मोंदींच्याच या सभेच्या निमित्ताने या मोहिमेला हरताळ फासल्याचे चित्र होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!