Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेतून दोन महिलांनी रोकड लांबवली

Share

विखरणी  | वार्ताहर

बँक ऑफ महाराष्ट्रच्या येवला शाखेतून रक्कम काढली असता दोन अनोळखी महिलांनी रक्कम चोरून पोबारा केल्याची घटना घडली असून या प्रकारामुळे येवल्यात खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी की, येवला येथील बँक ऑफ महाराष्ट्र येथे एक वयोवृद्ध इसम पैसे काढण्यासाठी आले होते सदर इसमाने आपल्या खात्यातून ४० हजार इतकी रक्कम काढून हातातील पिशवीत ठेवले होते या संधीचा फायदा घेत बँकेत आलेल्या दोन महिलांनी हातातील पिशवीत ब्लेडने कापून या पिशवीतून ४० हजार रुपये हातोहात लंपास केले.

पंजाबी ड्रेस घातलेल्या २० ते २५ या वयोगटातील या महिला असून बँकेतील सी सी टी व्ही चित्रण पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे या महिला कुठे आढळल्यास येवला शहर पोलिसांसी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक कोळी यांनी केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!