Type to search

Breaking News Featured ब्लॉग मुख्य बातम्या

Blog : ग्रामीण तरुणाई मागेच…

Share

गाव शहर यात खुप फरक आहे शहरी  ग्रामीण तरुण असो व्वा संस्कृती असो  पाहिलं तर साम्य बघितलं तर भिन्न. शहर तेथील राहणीमान वागणं बोलणं  आधुनिक प्रगत झालेत.

त्या सोबत तेथील तरुण आणि सर्वांचे रहाणीमान  वागण्याची स्टाईल बदलली. सुख,  सुविधा,  शाळा,  कॉलेज उंच शिक्षण, उदयोग,  बॅंक कारखाने. हॉटेल, मॉल, मार्केट यार्ड,  विविध शासकीय कार्यालये ई. अनेक सोई सुविधा  शहरात असल्या मुळे अर्थात तेथील तरुण पुढे आहे. सर्वच बाबतीत असं वाटते पण पाहिलं तर तसं नाही शहर आणि शहरीकरण वाढलं त्यात ग्रामीण भागाचा मोलाचा सहभाग आहे. आपण म्हणाल कसं?

तर शहर वाढली ते ग्रामीण लोकं शहरा कडे वळली तेव्हा चं शहरांची लोकसंख्या आणि तेथील उदयोग वाढले वाढीस लागले असंच ना. म्हणजेच शहरे हि ग्रामीण भागातील तरुण शहरात आली तेव्हाच प्रगती झटपट झाली. अर्थात तेथे ग्रामीण म्हणुन पहिले थोडा मान कमी पण तेथे पण ग्रामीण भागातील होतकरु हुशार तरुण लोकांनी आपली बुद्धिमत्ता सिद्ध केलीच..

ग्रामीण भागात शिक्षण बऱ्याच ठिकाणी तोडके मोडके स्वरूपाचे जुजबी भाषा स्वतःची बोली सर्वंच अभाव शहरात कुठं हस होतं तर कुठं कौतुक.सुरवात त्यांच्यावर हसण्यानं पण नंन्तर त्याचेच अनुकरण करण्यात  तेथील लोक सरसावतात.   आज पर्यंत चा इतिहास वर्तमान असं सांगतं कि शहरात सुद्धा ग्रामीण भागाचे वर्चस्व राहिलेय राहात आलंय आज पर्यंत जी नेते मंडळी  असो वा  नोकरदार.

शहरात ग्रामीण भागातूनच. मग ती इंग्रज काळातील असो वा आतापर्यन्त सारी जास्तीत जास्त ग्रामीण गावची .. फक्त कमी पडली ती उधोगात उदोग करण्यात हाती कमी पैसा  त्याचा अभाव आणि   उदोग करू आणि त्यात कमी पडलो तर कसं होईल त्या क्षेत्रात  धाडसाचा अभाव राहिला ग्रामीण भागाचा बाकी सर्व आघाड्यावर पुढे. पण ज्यांनी केला सचोटी रोमरोमात चांगला केला करताय. म्हणुन मागे आहेत. मुळात ग्रामीण भागात उच्चं शिक्षणाचा अभाव इंग्रजी आणि तंत सम अनेक भाषा यात बरेच मागे असतात.

त्यामुळ बाहेर गेले  भाषा आणि शहरातील राहणीमान तामझाम झगझगाट पाहुन गांगरून जातात संकुचित होतात आपली स्वतःची उंची कमी वाटते आपण काहीच नाही आहोत या जगात तेथे ज्याने बिनधास्त उडी मारली अरे हि पण आपल्या सारखीच माणसं आहेत कशी पळतात पैशा साठी आपण पण पळालो तर आपण पण यांच्या सारखे होऊ हे जे समजले त्यात विलीन झाले जे नाही समजले ते मागे फिरले मागे राहिले..

जो शहरात गेला त्यानं परत फिरून कधी गावा कडे मागे पाहिलं नाही आपण गावचं काही देण आहोत ज्या मातीनं निर्मिती केली तीच माती शहरात गेल्यावर विसरतात  जे गेले त्यांना सुरवातीला वेळ नसतो त्यांच त्यांना पडलेलं असतं येथे टिकायच कसं पाय रोवुन सावरून शहरात उभे राहतात शहराला जवळ करण्यात बराच अवधी जातो स्थीरस्थावर व्हायला यात त्यांचा दोष नसतो मागे पाहायला गेले तर तेच मागे पडतील असो. आपला विषय ग्रामीण तरूण मागे का?

सर्व साधनांचा अभाव एक घरची परिस्थिती  पैश्याची कमतरता शिक्षण कसंबस घेतात गावच्या शाळेत उंच तंत्रन्यान मिळतं नाही तसंच  गाव, गोठा, गाई म्हशी. चारापाणी शेती घर यात गुरफटलेले असतात.  कॉलेज होलसेल दुकानं  मार्केट  दवाखाना शासकीय कार्यालय  गाड्या रस्ते पाणी वीज या सर्व सोई सुविधा अभाव असतो. योग्य मार्गदर्शन मिळतं नाही दिशा सापडत नाही म्हणुन मागे राहण्याची दश्या असते.

बोलीभाषा राहणीमान अप्रगत म्हणुन मागे राहतात. ग्रामीण तरूण…या गोष्टी चा विचार करून शासन सामाजिक संस्था आणि शहरात गेलेली पुर्वी गेलेली तरुणाई जी आता म्हातारी झाली असतील त्यांनी लक्ष दिलं आपल्या आपल्या गावा कडे जसं जमेल तशी मदत आर्थिक नव्हे पण मार्गदर्शन सर्वांना नाही देऊ शकत तर आपल्या जवळचे त्यांना जरी केलं दिशा दाखवली तरी सहकार्य मिळेल थोडं असं मला वाटतं..  मला जसं सुचलं तसं लिहिले…!

प्रदिप मनोहर पाटील, मो. 9922239055

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!