Blog : वासनेची चढलेली कात किती दिवस निष्पाप महिलांचा बळी घेणार?

Blog : वासनेची चढलेली कात किती दिवस निष्पाप महिलांचा बळी घेणार?

माणूस…. एक सामाजिक प्राणी आहे असे आपण अगदी लहानपणापासून शिकतो. समाज म्हटले कि, त्यातल्या प्रत्येक घटकाचे समाजातले स्थान, कर्तव्य, जबाबदारी आणि काही मिळणारे लाभ हि आलेत, मग यात “स्त्री” चे स्थान कुठे आहे ? आपण कितीही “स्त्रीपुरुष समतावाद” (feminism) च्या गोष्टीं करत असलो तरी खरंच आजची स्त्री मुक्त आहे का?

स्त्री चे स्थान हे एक व्यक्ती म्हणून नव्हे तर एक वस्तू किंवा सेवा पुरवणारी व्यवस्था म्हणूनच आहे, हे इतके नागडेपणाने कुणी मांडत नसले तरी स्त्रीविषयक दृष्टिकोनाचा गाभा तोच आहे. घराला कुंपण, गाडीला गॅरेज, गुरांना गोठा आणि स्त्री ला मर्यादांची बंधन घातली जाऊ लागतात.

पुरुषांनी स्त्रियांचे रक्षण करायचे असते आणि तसे करायच्या ऐवजी तेच त्यांचे शोषण करू लागतात किंवा पुरुष स्त्रियांचे/ त्यांच्या अधिकारांचे, लज्जेचे, अब्रूचे रक्षण करण्यात कमी पडतात. जर या पुरुषांनीच आपल्या घानेरड्या नजरा आमच्यावरून हटवल्यात तर आम्ही स्त्रिया ताठ मानेने चालू शकू….

प्रसिद्ध लेखक सुझान ब्राऊनमिल्लर यांच्या “against our will” या पुस्तकात त्यांचं एक विधान आहे… “Rape is nothing more or less than a process of intimidation by men to keep all women in a state of fear”..(पुरुषांनी समस्त स्त्री वर्गाला सतत दहशतीत ठेवण्यासाठी अंगीकारलेली एक प्रक्रिया म्हणजे बलात्कार )

बलात्कार ” या शब्दातच वासनेची चढलेली कात आहे, या शब्दाला एक वेगळाच अर्थ आणि घृणास्पद परिमाण आहे, हा शब्द उच्चरला तरी मनात आत पर्यंत धडधडायला होतं. हा शब्द नवीन नाही किंवा हि कृती पण नवीन नाही, फक्त प्रत्येक वेळी बळी नवीन आहे आणि प्राणिवादाच्या सीमारेषा ओलांडणारा माणूस नवीन असतो, BBC च्या online लेखात असं वाचण्यात आला ki, UNICEF च्या आकडेवारी नुसार जगातील 20 लाख मुली कधी ना कधी लेंगिक शोषणाच्या बळी ठरल्या आहेत, म्हणजेच 10पैकी एका मुलीला लेंगिक शोषणाचा सामना करावा लागला आहे.

महिलांवर झालेल्या अत्याचारावर गुन्हेगाराणा दिली जाणारी शिक्षा याची लांबसडक यादी आपल्या कायद्यात आहे, पण अम्लीकरणात मात्र शून्य. जो पर्यंत कायदा कडक होणार नाही तोपर्यंत प्रत्येक दिवशी बलात्कार होतंच राहतील, जर या देशाचा कायदा बलात्कार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा करण्यात सक्षम नसेल तर त्या स्त्रीला हा अधिकार द्या कि ती स्वतः अश्या नराधमांना शिक्षा करेल…

अश्या घटना जेव्हा घडतात तेव्हा आपण candel march काढतो, , social media वर आपला राग जाहीर करतो आणि रस्त्यावर येऊन “हाय -हाय “चे नारे लावतो… आणि त्यात अजून भर म्हणजे, काही लोक असंही बोलतात….निर्भया प्रकरणावेळी एका महिलेचे T.V. वरील एक विधान आठवते.. त्यात त्या असं म्हणतात कि, झेपत नव्हते तर मैत्रिणीला घेऊन एकटे दुकटे बाहेर जायचं कशाला… तीच गोष्ट शक्ती मिल कंपाऊंड मध्ये महिला पत्रकार हिच्यावर झालेल्या बलात्काराची….,

आणि आता नुकतीच हेदराबाद मध्ये घडलेली घटना.. एका महानुभाव नेत्याने केलेले विधान “प्रियांका रेड्डी या शिकलेल्या होत्या, बहिणीला फोन करण्यापेक्षा 100 वर फोन करायचा असता ” असो.. बलात्कार ही कुठल्याही स्त्री च्या बाबतीत घडू शकणारी, त्यांचे आयुष्य उध्वस्त करू शकणारी, त्यांचे सर्वस्व हिरावून घेऊ शकणारी अशी एक गोष्ट आहे, हा व्यभिचार फक्त तिच्या शरीरावर च नव्हे तर मनावर सुद्धा आघात करून जातो ज्यातून ती कधीच बाहेर येऊ शकत नाही आणि समजा आलीच तर अजून कुणाच्या तरी वाईट नजरा टपलेल्याच असतात तिला संपूर्ण संपवण्यासाठी… आता तरी स्त्री ची हि होणारी अवहेलना थांबायला हवी, अजून किती दिवस हि वासनेची चढलेली कात किती निष्पाप स्त्रियांचा बळी घेणार आहे…

शेवटी इतकच …

“जिंदगी कि बहीखाते में बस इतनी सी कमाई हैं
मेरी माँ सुकून से मुस्कुराई हैं ?

शब्दांकन – शमिका खुशाल कारिया

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com