Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : राष्ट्रवादी, मनसेकडून ‘महाजनादेश’ला काळे झेंडे, काळे फुगेही उडवले आकाशात

Share

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिकमध्ये भाजपची महाजनादेश यात्रा सुरु आहे. याच वेळी सरकारचा राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. काळ्या रंगाचे फुगे, तसेच निषेधाचे फलक झळकावत भाजपचा निषेध केला.

राष्ट्रवादी महिला काँग्रेस व युवक काँग्रेस यांच्यावतीने नाशिक महाजनादेश यात्रेच्या मार्गा दरम्यान अनेक ठिकाणी काळे झेंडे दाखवून, काळे फुगे सोडून निदर्शने करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, युवक जिल्हाध्यक्ष पुरुशोत्तम कडलग, रविंद्र शिंदे, सुरेखा निमसे, सायरा शेख, मेघा दराडे, संदिप गोत्राणे, निखील भागवत, गणेश गायधने, संदिप भेरे, विजु आहिरे, प्रफुल पवार, अक्षय भोसले, मानिक कडलग आदींची उपस्थिती होती.

Leave a Comment

error: Content is protected !!