Type to search

महाराष्ट्रात मुख्यमंत्री ‘भाजप’चाच; अर्थमंत्री सुधीर मूनगंटीवार

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

महाराष्ट्रात मुख्यमंत्री ‘भाजप’चाच; अर्थमंत्री सुधीर मूनगंटीवार

Share

नाशिक | प्रतिनिधी

राज्यात भाजप सेना युतीचे ४१ खासदार आहेत. त्यामुळे पुढील मुख्यमंत्री भाजपचाच आहे. राज्याचे अर्थमंत्री आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. मुनगंटीवार यांच्या सूचक वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र, अद्याप शिवसेनेकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.

मुनगंटीवार म्हणाले, कालच महाराष्ट्र आणि भाजप पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक राजधानीत पार पडली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, मित्रपक्षाचे उमेदवार निवडून आले पाहिजे यासाठी प्रत्येकाने पूर्ण शक्तीने काम करा .तसेच भाजपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे असे काम करा असे आदेशही कार्यकर्त्यांना दिली.

ते म्हणाले की, राज्यात सेना भाजपच्या जागा वाटपावर तोडगा निघाला आहे.  शिवसेनेची कोणतीही नाराजी यामध्ये नाही. ‘मिले सूर मेरा तुम्हारा’… ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ असे म्हणून आम्ही काम करू आणि करत आहोत करत राहणार. तसेच आगामी विधानसभेत महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपचाच मुख्यमंत्री होईल यात शंका नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, राष्ट्रवादी वर्धापन दिनाला शुभेच्छा. काका-पुतण्याचे एकमत व्हावे ही इच्छा असल्याचे सांगत त्यांनी टोमणा हाणला. वेळोवेळी राष्ट्रवादीने आम्ही चुकलो तर वेळोवेळी अभ्यास न करता टीका केली आहे.  त्यामुळे आता त्यांनी अभ्यासपूर्ण टीका करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

मुनगंटीवार उवाच

  • राज्यात एकच लक्ष ३३ कोटी वृक्ष या उपक्रमासाठी नाशिकला विभागीय आढावा बैठक
  • यंदा तालुकास्तरावर आमदारांची समिती गठीत, वणप्रेमी, वन अधिकारी आणि ग्रामस्थ वृक्ष लागवड करणार
  • यंदाच्या वर्षी नाशिक विभागात ५ कोटी ८२ लाख वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट
  •  एमआयडीसी मध्ये देखील प्रदूषण रोखण्यासाठी हरित पट्टे तयार केले आहेत, त्यासाठी त्यांना झाडे लावावे लागतील, जर त्यांनी लावले नाहीतर त्यांना दंडात्मक कारवाई बरोबर कठोर कारवाई केली जाईल.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!