Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

खडसे की पाटील? भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी शोध सुरू

Share

मुंबई | प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षात नव्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नावापासून विद्यमान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या नावावर चर्चा सुरू झाली आहे.

खडसे यांचा राजकीय वनवास संपवण्यासाठी त्यांना प्रदेशाध्यक्षपद मिळणार असल्याचे जाणकार सूत्रांचे मत आहे. मात्र चंद्रकांत पाटील यांनी या पदासाठी नकार दिला असून एकनाथ खडसे यांना या पदासाठी प्रकृती साथ देत नसल्याचे सांगण्यात येत आहे.  दरम्यान, उदया राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही, तूर्तास विस्तार बारगळला असल्याची माहिती या सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस या विस्तारासाठी अनुकूल असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. मात्र आगामी विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी शिवसेनेचे कार्याध्यक्ष आदित्य ठाकरें यांना उपमुख्यमंत्री बनविण्याबाबतचा निर्णय शिवसेनेकडून घेण्यास विलंब झाल्यानेच हा विस्तार लांबणीवर पडल्याचे सांगण्यात येत आहे.

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवशी शिवसेना आमदारांनी मातोश्रीवर शक्तीप्रदर्शन केले, मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सेना आमदारांना निरोप पाठविण्यात आले होते.

उपमुख्यमंत्रीपद किंवा दोन कॅबिनेट मंत्रिपद घ्या ,मुख्यमंत्री फडणवीस यांचा उद्धव ठाकरें समोर प्रस्ताव देण्यात आला होता. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी भाजपची शिवसेनेसमोर ऑफर देण्यात आली होती.

मात्र त्या बाबतचा निर्णय होण्यास आता विलंब झाल्यानेच उदया राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नाही, तूर्तास विस्तार बारगळला अशी माहिती वरिष्ठ सुत्रांनी दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!