शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा कृषीविकासकामांचा जोरदार प्रचार

0

नाशिक, ता. ५ : ‍विरोधी पक्षांनी राज्यात नुकतीच काढलेली संघर्ष यात्रा आणि त्यानंतर विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या संघटनांनी पुकारलेला संप या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने गेल्या अडीच वर्षात शेतकरी हितासाठी घेतलेल्या योजनांचा आढावाच ग्राफिकद्वारे मांडला आहे.

शिवार संवाद सभा या नावाने प्रसिद्ध झालेला हा अहवाल सध्या सर्व प्रकारच्या सोशल माध्यमातून शेतकऱ्यांसह, पत्रकार, उद्योजक, व्यावसायिक, सामान्य नागरिक यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपाचा मीडिया सेल जोमाने कामाला लागला आहे.

या आढाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या सरकारने काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या तुलनेत कशी सरस कामगिरी केली आहे यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

संघर्ष यात्रेला चोख उत्तर देण्यासाठी भाजपाने ठिकठिकाणी शेतकरी संवाद यात्रेला सुरुवात केली आहे. या यात्रेदरम्यान शेतकऱ्यांसाठी केलेल्या चांगल्या योजनांची माहिती देण्यात येत आहे. त्यासाठी विविध समाजमाध्यमांचाही वापर करण्यात येत आहे.

भारतीय जनता पार्टीकडून याचसंदर्भात प्राप्त झालेला हा डिजिटल आढावा वाचकांसाठी येथे देत आहोत.

LEAVE A REPLY

*