बिगबाजारची महाबचत ऑफर; शेवटचे दोन दिवस शिल्लक

0

नाशिक दि. 13 प्रतिनिधी | स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत बिग बाजारकडून महाबचाव ऑफर्सची घोषणा करण्यात आली. 10 ऑगस्टला या ऑफरला सुरुवात झाली असून पहिल्या तीन दिवसांत ग्राहकांनी बिग बाजारमधून अक्षरशः विविध वस्तुंची लुट केली. ग्राहकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादात महाबचत ऑफरचे अवघे दोन दिवस शिल्लक आहेत.

बिग बाजारच्या या ऑफर्सची ग्राहक आतुरतेने वाट बघत होते. अखेर महाबचत ऑफरची घोषणा होताच ग्राहकांनी बिगबाजारमध्ये प्रचंड गर्दी केलेली दिसून आली. तीन हजार रुपयांच्या खरेदीवर फ्युचर पे च्या माध्यमातून बाराशे रुपये कॅशबॅक ऑफर ग्राहकांना देऊ केली आहे.

तसेच पहिल्यांदाच बिग बाजारमध्ये अनेक नामांकितब्रॅडसच्या वस्तू, सेंट्रल, इज़ीडे, नीलगिरिस, हेरिटेज फ्रेश आणि फूडवर्ल्ड स्टोर्स महाबचत ऑफर्समध्ये सहभागी झाले आहेत.ङ्गबिग बाजारच्या महाबचत ऑफर्समुळे करोडो रुपयांची उलाढाल होणार आहे.

विशेष म्हणजे बटर, टूथपेस्ट, तवा, लहान मुलांच्या सर्व वस्तू, होमवेयर, सामान, इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी वस्तूंमध्ये मोठी सवलत बिग बाजारकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तीन दिवसांत ग्राहकांच्या प्रचंड प्रतिसादात बिग बाजारमधून ग्राहकांनी अनेक वस्तूंची लयलुट केली. आता शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत, या दोन्ही दिवस गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

ग्राहकांच्या उत्तम सेवेसाठी तत्पर

बिग बाजारची ही महाबचत ऑफरच्या माध्यमातून ग्राहकांना जास्तीत जास्त सवलत देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यावर्षी बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास करून ग्राहकांना चांगल्या प्रकारे सुविधा देण्याचा आमचा मानस आहे. विविधनामांकितब्रॅडस कंपन्या सहभागी झाल्यामुळे यंदा व्याप्ती वाढली आहे.

सदाशिव नायक,बिग बाजारचे मुख्य कार्यकारी अधिकारी.

LEAVE A REPLY

*