Type to search

Breaking News Featured maharashtra नाशिक मुख्य बातम्या

भुजबळ काका-पुतण्यांनी भिकार्‍यांचा भूखंड लाटला; अंजली दमानिया यांचा सनसनाटी आरोप

Share

नाशिक । प्रतिनिधी

माजी उपमुख्यंमत्री छगन भुजबळ व त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी 2 हजार 653 कोटींची माया कमावली असून या प्रकरणी ते जामिनावर बाहेर आहेत. भुजबळांनी मुंबईतील चेंबूर येथे भिकार्‍यांसाठी उभारण्यात येणार्‍या भूखंडाचे आरक्षण बदलून त्यातून प्रचंड माया कमवली.

भुजबळांनी भिकार्‍यांनादेखील लुटले आहे, असा सणसणाटी आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.

दमानिया यांनी भुजबळांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणारा व्हिडीओ त्यांच्या फेसबुक पेजवर लोड केला आहे. भ्रष्टाचार प्रकरणी भुजबळ काका-पुतणे दीड वर्षे तुरुंगात होते. यावेळी त्यांना सर्व सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या जात होत्या. त्यांंच्यासाठी पाच फुटाचा टीव्हीची देखील व्यवस्था करण्यात आली होती.

समीर भुजबळांना नारळ पाण्यातून ओडका दिला जायचा, अशी देखील माहिती मिळायची. याबाबत आम्ही तुरुंग अधीक्षकांना माहिती दिली होती, असा गौप्यस्फोट दमानिया यांनी केला आहे.

भुजबळ यांनी माया कमविण्यासाठी कामगार, शेतकरी, गोरगरीब अगदी भिकार्‍यांनाही लुटले आहे. सत्तेचा दुरुपयोग करून भुजबळांनी लूट अक्षरश: लूट चालवली होती.

मुंबईतील सांताक्रूज येथे ज्येष्ठ नागरिक असलेल्या फर्नांडीस दाम्पत्याचे घर होते. 1934 मध्ये त्यांनी हा बंगला बांधला होता. त्यांनी हे घर रिडेव्हलेपमेंटसाठी रहेजा बिल्डरला दिले होते. त्या बिल्डरने फर्नांडीस यांना अंधारात ठेवत हा बंगला परस्पर भुजबळांना विकला.

या ठिकाणी भुजबळांनी टोलेजंग इमारत बांधली. ज्याचे या ठिकाणी घर होते त्या फर्नांडीस दाम्प्त्याला त्यांचे पैसेही दिले नाही. त्यांना तीन मुले असून ते मानसिकरित्या अक्षम आहेत. हा देखील त्यांनी विचार केला नाही. एवढेच नव्हे तर, मुंबईतील कासम नगर येथे रि – डेव्लपेमेंट प्रोजेक्ट होता. मात्र, भुजबळांनी तेथील लोकांनाही सोडले नाही, असा आरोप दमानिया यांनी केले आहेत.

आजारी पडायचे नाटक

तुरुंगात असताना भुजबळ आजारी पडायचे नाटक करायचे. लोकांची सहानुभूती मिळविण्याची धडपड होती. मात्र, तुरुंगातून बाहेर आल्यावर भुजबळ आजारी असल्याचे कधीही ऐकले नाही. किंवा उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये गेल्याचे समजले नाही.

भुजबळांना लाज वाटायला हवी

भुजबळांनी लोकांना लुटले असून त्यांना जनाची नाही निदान मनाची तरी लाज वाटायला हवी होती. नाशिककरांना कळकळीची विनंती आहे की, अशा लोकांना मत देऊ नका. समीर भुजबळसारखे लोक पुन्हा निवडून आले तर आमच्या लढ्याला अर्थ उरणार नाही. जे चांगल्या पद्धतीने तुमचा आवाज मांडतील, अशा लोकांना निवडून द्या.

– अंजली दमानिया

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!