मराठी चित्रपटाला महाराष्ट्रात तरी मोकळा श्वास घेता येईल का? भाऊ कदम यांची भावनिक पोस्ट

0

नाशिक | महाराष्ट्रातच मराठी सिनेमांची होणऱ्या गळचेपीचा फटका भाऊ कदम यांच्या नशीबवानलाही झाला आहे. याबाबतची नाराजी भाऊ कदम यांनी त्यांच्या फेसबुकपेजवर व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रात हिंदी सिनेमांमुळे मुंबई पुण्यासारख्या बड्या शहरात अक्षरश: मुस्कटदाबी होत आहे. पारिभाषिक चित्रपट हिट होतात आणि मराठी चित्रपटांच्या वाट्याला निराशा येते असेही भाऊ कदम यांनी म्हटले आहे.

मध्यमवर्गीयांसाठी तयार केलेला हा चित्रपट बघण्यासाठी मराठी लोकं येत नसल्याची अफवा पसरवली जाते तसेच दुपारची मोजकेच शोही दिले जात आहेत असेही त्यांनी सांगितले.

भाऊ म्हणतात, ज्या डोंबिवलीचा उल्लेख सर्वजण अभिमानाने घेतात तिथे मराठी चित्रपटाला एक शोदेखील मिळाला नाही हे दुर्दैव. एकाच दक्षिणात्य चित्रपटाने मुंबईतील आठवड्याभरतील सर्व शो अडवले. यामुळे महाराष्ट्रातच मराठीची गळचेपी होताना दिसून येत आहे.

भाऊ कदम यांची भावनिक फेसबुक पोस्ट

 

LEAVE A REPLY

*