Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पावसाच्या लपंडावामुळे त्र्यंबक तालुक्यात भात आवणी खोळंबली

Share

त्र्यंबकेश्वर | विशेष प्रतिनिधी

गेल्या आठवड्यात त्र्यंबकेश्वर तसेच तालुक्यातील ग्रामीण भागाला झोडपून काढणाऱ्या मुसळधार पावसामुळे येथील शहरात पाणीच पाणी झाले होते. समाधानकारक पावसामुळे शेतीच्या कामांना गती मिळाली होती. मात्र, पावसाने अचानक मारलेल्या दडीमुळे अनेक ठिकाणी भात आवणीच्या कामांना उशीर झाला आहे. येथील शेतकरी आजही मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने पूर्णवेळ विश्रांती घेतल्यामुळे येथील कामे थांबली आहेत. त्यामुळे पावसाचा जर असाच लपंडाव सुरू राहिला तर शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास या पावसामुळे हिरावला जाण्याची शक्यता आहे.

तालुक्यातील अनेक ठिकाणी भात लावायला आले आहेत. मात्र, जमिनीत पाणी आणि चिखल नसल्यामुळे भाताची आवणी करता येत नसल्याचे येथील शेतकरी सांगतात. त्यामुळे येथील शेतकरी आजही मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे.

सर्व फोटो : मोहन कानकाटे, त्र्यंबकेश्वर

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!