Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिककरांनो दुध घेताना सावधान! दुधात आढळले प्लास्टिक; भेसळीच्या प्रकाराने खळबळ

Share

नवीन नाशिक | प्रतिनिधी

पाथर्डी फाटा परिसरात दुधात भेसळिचा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाथर्डी फाटा येथील आनंद नगर मधील द्वारकेश सोसायटीमधील रहिवासी रामाआधार रामशिस सिंग यांनी रविवार (दि.23) रोजी सायंकाळी आनंद नगर पोलिसचौकी समोरील आई आश्रम स्वीट्स बाहेरील दुध विक्रेत्याकडून नेहमी प्रमाणे दुध खरेदी केले.

दरम्यान, सोमवारी सकाळी दूध गॅस वर तापविण्यासाठी ठेवले असता त्यातून वेगळाच गंध येवू लागला व दुधामधे गाठी तयार होऊ लागल्या. दरम्यान, या दुधाच्या गाठी या प्लास्टिक सदृश्य दिसू लागल्या व रबर सारख्या तानल्या जाऊ लागल्याने दुध भेसळीचा प्रकार उघडकीस आल्याने सिंग यांनी त्यांचे मित्र नगरसेवक राकेश दोंदे यांना सदर माहिती कळविली असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संपर्क साधुन सदर माहिती कळविली.

प्रकार गंभीरच

सदर प्रकार हा गंभीर असून जरहे दुध लहान अथवा मोठे कुणी पिले असते तर त्यांची प्रकृती नक्कीच बिघडली असती याप्रकरणी अन्न औषध तपासणी विभागात व स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार करणार असुन या प्रश्नी दोषींवर करवाई करण्यात यावी अन्यथा आन्दोलनाचा पवित्रा घेण्यात येईल.

राकेश दोंदे, नगरसेवक नविन नाशिक

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!