Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

बँक, फायनान्स कंपन्यांनी सुरक्षिततेसाठी ‘इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी सिस्टीम’चा वापर करावा

Share

नाशिक । दि. 14 प्रतिनिधी

आज शहरातील एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयात दरोडेखोरांनी अंदाधूंद गोळीबार करत धुडगूस घातला. या घटनेत एका कर्मचार्‍याचा गोळी लागून मृत्यू झाला तर इतर कर्मचारी जखमी झाले. दरम्यान, बँका, फायनान्स कंपन्यांनी अचानक ओढावलेल्या आपत्तीला तोंड देण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज आहे.

कंपन्यानी सीसीटीव्ही बसवले म्हणजे आपली कंपनी सुरक्षित आहे असे समजू नये. यासाठी वेगवेगळ्या अंगांनी विचार करुन अलार्म सिस्टीम बसवले पाहिजेत असे मत तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये फक्त गुन्हा कशाप्रकारे घडला हे समजते. मात्र, यापेक्षा अत्याधुनिक तंत्रज्ञान बाजारात दाखल झाले असून याद्वारे थेट पोलीसांना किंवा संबंधित कंपनीच्या पदाधिकार्‍यांनी धोक्याची घंटा पोहचते. यामूळे सावधानतेने प्रकरण हाताळून होणारे नुकसान टाळता येऊ शकते.

मोठमोठ्या कंपनींची मालमत्ता, ठेवीदार्‍यांच्या ठेवी यावर विमा उतरवलेला असतो. यामूळे दरोडा पडल्यानंतर कंपन्या डबघाईला जातात असे नाही तसेच कर्मचार्‍यांना याबाबत जबाबदार धरले जाते असेही नाही.

त्यामूळे दरोडेखोर आले तर, विरोध न करता शांततेत परिस्थिती हाताळली गेली पाहिजे. याबाबत बँका, फायनान्स कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना सुरक्षिततेचे धडे दिले पाहिजेत. तसेच बदलत्या तंत्रज्ञानाचा अवलंब करत त्यांना अपडेट केले पाहिजे.

सायलेंट सायरन किंवा ऑटोमॅटीक टेलिफोन डायलिंग सिस्टिमचा वापर केला तर गुन्हा घडत असताना परिसरातील पोलीस, संबंधित अधिकारी यांचे नंबर याठिकाणी फीड केले असतली तर त्यांना याबाबत माहिती मिळते यातून तात्काळ गुन्हेगार गजाआड होऊ शकतात.


कर्मचार्‍यांना प्रशिक्षण द्यावे

कर्मचार्‍यांसाठी आपात्कालीन परिस्थितीत काय करायला हवे याचे प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. दरवर्षी किंवा वर्षातून दोनदा असे प्रशिक्षण वर्ग घेतले पाहिजेत. यातून नवे तंत्रज्ञान अवगत होऊन कर्मचार्‍यांना बळ मिळते, त्यांच्या मनातील भिती नाहीशी होते.

सुनिल गिध, ब्रेन इनोव्हेशन्स, नाशिक

 

सीसीटीव्ही म्हणजे पुर्ण सुरक्षितता नाही

सीसीटीव्ही बसवले म्हणजे पुर्णपणे आपली मालमत्ता सुरक्षित नाही. सीसीटीव्ही बसवून घडेलेला गुन्हा कशाप्रकारे घडला याची माहिती मिळते. गुन्हा घडत असताना कशी काळजी घ्यावी याबात यंत्रणा बसवावी.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!