Type to search

Breaking News Featured नाशिक ब्लॉग मुख्य बातम्या

बालदिन विशेष : बालमजुरी वाढली…

Share

“बालदिन विशेष – बालमजुरी वाढली…”
चाचा नेहरू आठवायचे
आणि भाषणाच्या भीतीचे
काहूर मनात उठायचे ||१||

भाषणाला सर्वांनसमोर उभे राहता
पोटात गोळे उठायचे
त त प प पार पाडता अध्यक्ष महाशय
पूज्य गुरुजन आणि माझे मित्र बाहेर पडायचे ||२||

पंडितजींच्या हृदयातील एक अमुल्य ठेवा होता. मुलं ही देशाची खरी संपत्ती आहे, या दृष्टीकोनातून नेहरुंनी आपल्या विकास कार्यक्रमात बाल कल्याणाच्या उपक्रमांना नेहमीच अग्रक्रम दिला. ”मुलं काय शिकतात यापेक्षा त्यांच्यावर कोणते संस्कार होतात, हे पालक व शिक्षकांनी पाहिलं पाहिजे”, याबाबत ते आग्रही असत. 14 नोव्हेंबर हा नेहरुंचा जयंतीदिन खर्‍या अर्थाने ‘बालदिन’ म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो.

“बालहक्क” आमचे हक्क ही आमची गरज आहे. त्या कोवळ्या मुलांना ही त्यांची गरज आहे… हे देखील माहीत नाही . त्यांना त्यांच्या हक्क च्या सर्व गोष्टी मिळायला हव्यात त्यांना जगण्या चा अधाकीर आहे मग ती मुलं अगदी लहान असो की मोठी गरीब असो की श्रीमंत त्यात जात, धर्म या गोष्टी ना थारा नसावा.

अपूऱ्या सोयी सुविधा , अपुऱ्या आरोग्य सेवा मूलभूत शिक्षणा च्या अपूर्ण सोयी या सारख्या अनेक करणा मुळे आज देशात बाल कामगारांची संख्या वाढली आहे.… त्या बाबत काही किस्से सांगायचे झाले तर काही मुलं ही घरी कमावणारी व्यक्ती नाही त्यांच्या वर सगळी जबाबदारी आली आहे म्हणून काम करतात तर काही पळून आलेली असतात. प्रत्येक जन कोणत्या ना कोणत्या परिस्थितीला भाग असतात… त्या वर उपाय तात्पूरते निघाले पण त्या वर जालीम उपाय करण्याची गरज आहे. पण सरकार मात्र बाल कामगारांचे प्रश्न सोडवण्यास अपयश …

बाल कामगारांचे पुनर्वसन करण्यास तसेच नवीन बाल कामगार तयार होणार नाहीत ,या साठी कठोर उपाय योजना करण्यास सरकारला अपयश आल्याने बाल कामगार कायदा हा नुसता कागद ची भेडोली बनून राहिला असल्याचे चित्र आहे.

१४ वर्ष खालील मुलांन कडून काम करून घेणे हा बागुन्हा ल कामगार कायदा नुसार गुन्हा ठरतो . परंतु या कायदाची कठोर अंमलबजावणी करायची ठरवल्यास पोलीचीना दररोज हजारो व्यावसायिक व मालकावर कारवाई चा बडगा उभारावा लगेल. मध्यंतरी मुंबई ,पुणे ठाणे ,औरंगाबाद सहा इतर विभागातून पोलीसानी बाल कामगार कायदा अंतर्गत कारवाई करत अनेक मुलांची तर काही ठिकाण हून मुलींची धोकादायक व इतर व्यवसायातून सुटका केली होती .

परंतु सुटका केलेल्या या मुलांचे पुढे काय झाले… ?सध्या ते कुठे अहेत….?? या प्रश्ना ची उत्तर पोलिसांन कडे नव्हती . चहा च्या टपरी वर आपल्यला साहेब बनवत चहा देणारा… बांधकामा वर सिमेंट विटा ची टोपली वाहणारा,डोंबारयाचे खेळ करणारा तसेच जीवावर उदार होऊन तारे वर च्या कसरती करणारा ,बस आणि रेल्वे स्थानकावर बूट चका चक करणारा… रेल्वे मध्ये बारीक सारीख गोष्टी पेन ले … एअर रिंग्स ले … आदी एक न अनेक स्वरूपात आपल्यला बाल कामगार भेटत असतात . खेळण्या बागडण्या च्या वयात कुटुबाचा ,पोटाचा भर उचलण्य साठी ही कोवळी पोरं आपल्या भविष्याचा लिलाव करत असतात . भूकबळी,गरिबी,या सारखीच बाल कामगार ही या देशापुढील एक भीषण समस्या बनली आहे.

बाल कामगारांचा प्रश्न दोन टप्यात पूर्ण पणे सोडवण्याचा संकल्प सरकार नी केला होता . या मध्ये सन २००९ मध्ये धोकादायक उद्योगधंद्यामधून बाल कामगार ची सुटका करणे आणि २०१० मध्ये सर्व प्रकारच्या व्यवसाया मधून १४ वर्षा अंतर्गत मुलांची सुटका करणे आदि उद्दिष्टे असणारा कार्यक्रम आखला होता .

परंतु बाल कामगार बनवण्यास भाग पडणाऱ्या गरबी,दारिद्र्य दूर करण्यास सरकार ने सक्षम पर्याय न दिल्याने आज ही दररोज गाव गावात व शहरात बाल कामगार तयार होत आहेत . आणि याला प्रतही बंध करण्यास प्रशासन ही अपयशी ठरल्या चे भासुर चित्र हल्ली दररोज बातम्या वाचून ,पाहून आपल्या सर्वनच्या समोर आले आहे. त्यांना त्याचं बालपण मिळायला हवं खेळण्या बागडण्या चा त्यांचा अधाकीर त्यांना मिळायला हवा.

– मृणाल पाटील

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!