Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

बागलाणमध्ये परिवर्तन; भाजपच्या दिलीप बोरसेंना संधी

Share

नाशिक | प्रतिनिधी 

अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या बागलाण विधानसभा मतदार संघात भाजपने मुसंडी मारली. माजी आमदार संजय चव्हाण घराण्याचे दरवर्षीचे प्रतिस्पर्धी विरोधक माजी आमदार दिलीप बोरसे यांच्या बाजूने बागलाणवासियांनी कौल दिल्यामुळे दीपिका चव्हाण यांना यंदाच्या निवडणुकीत दारूण पराभव स्वीकारावा लागला.

बागलाण विधानसभेसाठी एकूण ६ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये श्रीमती अंजनाबाई मोरे यांना 981 मते मिळाली. राष्ट्रवादीच्या दिपीका चव्हाण यांना 60 हजार 989 मते मिळाली.

भाजपच्या दिलीप बोरसे यांना 94 हजार 683 मते मिळवत विजयावर शिक्कामोर्तब केले. गुलाब गावित यांना 1547 मते मिळाली.

पंडित बोरसे यांना 1204 तर राकेश घोडे यांना 5 हजर 196 मतांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत १६५२ मतदारांनी नोटा पर्यायाचा वापर केले तर 77 टपाली मते बाद झाली.

शहर भाजप, नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्यासह शहरातील कार्यकर्त्यांनी चारफाटा येथे गर्दी करत एकाच जल्लोष केला. आघाडी न तुटण्याची शक्यता असल्याने बोरसे समर्थकांनी फटाक्यांच्या आतषबाजीत शहर दणाणून सोडले.

निवडणुकीआधीच चव्हाण या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याच्या चर्चांना उधान आले होते, मात्र, शरद पवार यांच्या दौऱ्यानंतर त्यांनी पक्षात राहणे पसंत केले होते.

विधानसभेत सर्वात जास्त प्रश्न विचारण्याचा विक्रम उत्तर महाराष्ट्रात दीपिका चव्हाण यांचा होता. मात्र, बागलाणवासियांनी चव्हाण यांना नाकारत पुन्हा एकदा माजी आमदार असलेल्या लाडूद गावातील दिलीप बोरसे यांना संधी दिली आहे.

भाजपने जर राज्यात सत्ता स्थापन केली तर अनेक वर्षांनंतर राज्यात आणि तालुक्यात एकाच पक्षाचा लोकप्रतिनिधी बागलाणमध्ये विराजमान झालेले दिसणार आहेत. यामुळे विकासाला अजून गती मिळेल, एमआयडीसीचा प्रश्न निकाली निघेल, रोजगार उपलब्ध होईल असे बोलले जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!