Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

त्र्यंबकेश्वर : देवस्थानला बारी उभारणीसाठी पुरातत्व विभागाची मंजुरी; भाविकांची गैरसोय टळणार

Share

त्र्यंबकेश्वर | शिवानी लोहगावकर

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला भाविक रांगा व सुव्यवस्थेसाठी बारीचे बांधकाम करण्यास पुरातत्व विभागाकडून मंजुरी मिळाली असून लवकरच बारीचे बांधकाम सुरू होणार आहे.

पुरातत्व विभागाच्या नियमानुसार मंदिराच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्याची परवानगी नसल्याने भाविकंच्या सोयीसाठी रांगेमध्ये मंडप उभारण्यात आला आहे.

स्वच्छतागृह, पाणी आणि ऊन व पाऊस या पासून बचाव, फॅन या सारख्या प्राथमिक सुविधा मात्र या मंडपामध्ये देता येत नाहीत. त्यामुळे  भाविकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते .

मात्र, आता पुरातत्व विभागाने बारी बांधण्याची परवानगी दिल्याने शिर्डी, पंढरपूर आणि तिरुपती बालाजी या सारख्या देवस्थानांप्रमाणे त्र्यंबकेश्वरला देखील दर्शन रंगांसाठी इमारत होणार असून तास न तास रांगेत उभे राहायला लागण्याऱ्या भाविकांना दिलासा मिळणार आहे.

शिर्डी, तिरुपती बालाजी, पंढरपूर या मोठ्या देवस्थानांमध्ये जसे दर्शन बारी बांधण्यात आले आहे तसेच आपल्या कडे देखील बांधण्याची मंजुरी चार दिवसांपूर्वीच मिळालेली आहे. त्यामुळे लवकरच भाविकांसाठी दर्शन बरीचे बांधकाम सुरू करण्यात येईल.  आतापर्यंत घटना दुरुस्ती झालेली नव्हती त्यामुळे मंदिरातील दान इथर कारणासाठी खर्च करता येत नव्हते, मात्र आता काही दिवसांपूर्वी घटना दुरुस्ती झाली आहे.

त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे पहिलीच 26 लाखांची मदत सांगली कोल्हापूर आणि सातारा येथील पूरग्रस्तांना गेलेली आहे. त्यामुळे आता सामाजिक कार्यासाठी मदत करणे शक्य होईल. मंदिरात एकूण 120 शिपाई आणि 12 अधिकारी आहेत. त्यांचे पगार, मंदिरातील इतर सर्व खर्च हे भाविकांकडून येणाऱ्या दानातून केले जाते. अलीकडेच मंदिरात व दर्शन रंगांमध्ये 4 वाटरकूलर आणि एक्वागार्ड बसवले आहेत.

तृप्ती पंकज धारणे, ट्रस्टी- त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!