Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : अविनाश आदिक यांच्या वाहनातून साडेचार लाखांची रक्कम हस्तगत

Share

नाशिकरोड | प्रतिनिधी

येथील शिंदे परिसरात भरारी पथकाच्या कारवाईत एका वाहनातून साडेचार लाखांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. रक्कम माजी मंत्री दिवंगत गोविंदराव आदिक यांचे पुत्र अविनाश आदिक यांच्या वाहनातून हस्तगत केल्यामुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी की, काल (दि २७) रात्री ११ वाजेच्या सुमारास शिंदे गाव परिसरात नाशिक पोलिसांच्या भरारी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयित वाहन एमएच १७, सीडी ३१४९ मधून रोकड नेली जात असल्याचे समजले.

त्यानुसार, भरारी पथकातील सदस्य हरी सूर्यवंशी, संतोष पिंगळे यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल शामराव शिंदे व सखाराम शेळके यांनी वाहन शिंदे परिसरात अडवले.

वाहनाची तपासणी केली असता ४ लाख ५८ हजार  रुपये मिळून आले. दरम्यान, घटनेची माहिती भरारी पथक प्रमुख मच्छिंद्र कांगणे, यांनी रक्कम ताब्यात घेऊन मध्यरात्री दीड वाजता कोषागार कार्यालयात जमा केली. दरम्यान, अविनाश हे मुंबईत मोठे व्यावसायिक असल्याचे समजते.

Leave a Comment

error: Content is protected !!