Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

देशभरातील पेट्रोल पंपांवर आता ‘ऑटोमेशन सेन्सर’ प्रणाली; पेट्रोलविक्रीची थेट माहिती मिळणार कंपनीला

Share

नाशिक | संदिपकुमार ब्रह्मेचा

ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण, इंधनसाठा, इंधनाची खरेदी विक्री ऑनलाईन होऊन देशातला प्रत्येक पेट्रोल पंप आता ऑटोमेशन सेन्सर तंत्रज्ञान प्रणाली द्वारे तेल कंपन्यांशी जोडला जाणार आहे.

पेट्रोलियम मंत्रालयाच्या आदेशानुसार देशातील सत्तावीस हजार पेट्रोल पंपावर ही अद्ययावत संगणकीकृत प्रणाली बसविण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरु आहे.

पेट्रोल पंपावर ऑटोमेशन सेन्सर संगणकीकृत प्रणाली बसविली जात आहे. या अत्याधुनिक सेन्सर प्रणाली मुळे पेट्रोल पंपाच्या टाकीतील इंधनसाठा, पेट्रोल डिझेलची होणारी खरेदी विक्री याची माहीती तेल कंपनीच्या कोड कंट्रोलर सर्व्हरद्वारे चोवीस तास कंपनीला मिळत राहील.

विशेष म्हणजे, अनेक पेट्रोल कमी मिळाले यावरून ग्राहक नेहमीच कंपनीवर टीकेची झोड उठवत असत. मात्र, या अत्याधुनिक प्रणालीद्वारे पूर्णपणे पारदर्शकता येणार असून जेवढ्या पैशांचे पेट्रोल ग्राहकाने भरले असेल तेव्हढयाच पेट्रोलची नोंद कंपनीकडे होणार आहे. यामुळे पेट्रोलचा काळाबाजार रोखण्यास मदत होईल असेल कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.


काय आहे प्रणाली?

या अद्ययावत प्रणालीला फोर कोट प्रणाली असे म्हटले जाते. या प्रणाली द्वारे पंपाकडे असलेला इंधनसाठा, ग्राहकाला विक्री केले जाणारे इंधन, किती वाजता आणि किती मिनिटांनी विक्री केले याबाबतची नोंद कंपनीला मिळणार आहे. तर ही माहिती संकलित करण्यासाठी पेट्रोल पंपावर ऑटोमेशन सेन्सर प्रणाली बसविण्यात आली असून याद्वारे संबंधित माहिती कंपनीला पुरविण्यास ही प्रणाली मदत करणार आहे. या प्रणालीचा अंदाजित खर्च सहा ते सात लाखाच्या जवळपास आहे. हा संपूर्ण खर्च इंधन कंपनीने केला आहे.


पंपाचा पेपरलेस कारभार

पुर्वी पंपचालकांना दररोजचा इंधनसाठा, खरेदी विक्री, शिल्लक साठा याबाबतचा सविस्तर अहवाल तयार करावा लागत होता. तसेच हा अहवाल संबंधित कंपनीलाही पाठवावा लागायचा. या प्रणालीद्वारे थेट कंपनीला माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार असल्यामुळे नियमित तयार करण्यात येणाऱ्या अहवालापासून मुक्तता मिळणार आहे.


वायरलेस कम्युनिकेशन

सर्वच पंपावर सिमेंटचे पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत. त्यामुळे टाकीत इंधनसाठा किती आहे हे कळत नव्हते .ब्लॉक मुळे साठा कळण्यास अडचणी निर्माण होत होत्या. यासाठी वायरलेस कम्युनिकेशन प्रणाली गरजेची होती.


ग्राहकांच्या उत्तम सेवेसाठी सदैव सज्ज आहोतच. कंपनीने बसविलेली अत्याधुनिक प्रणाली आता गरजेची झालेली होती. काळानुसार बदल झाल्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी कमी होण्यास मदत होणर आहे.

अविनाश पाटील, आदित्य पेट्रोलियम, आनंदवली


सर्वच पंपावर ही प्रणाली सरकारच्या सूचनेनुसार बसविली जात आहे. यातून इंधन खरेदी विक्री कंपनीला कळेल. तसेच अनावश्यक ठिकाणी होत असलेल्या इंधन पुरवठयावर मर्यादा येणार असून ज्या ठिकाणी इंधनाची अत्यावश्यक गरज आहे तिथेच इंधन वेळेत पोहोचविता येणार आहे.

सुनील चव्हाण, विक्री अधिकारी, इंडियन ऑईल

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!