Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

राष्ट्रवादीचे इच्छुक अपूर्व हिरे यांचा अपक्ष अर्ज दाखल; पश्चिमची जागा माकपला सुटण्याची शक्यता

Share

नाशिक | प्रतिनिधी 

राष्ट्रवादीचे गेल्या दोन वर्षांपासून आमदारकीची तयारी करत असलेले अपूर्व हिरे यांच्या नावाला राष्ट्रवादीने दुसऱ्या यादीतही स्थान न दिल्याने आज हिरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या महाआघाडीत माकप येत असल्यामुळे ही जागा माकपसाठी सोडली जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. डॉ. डी. एल. कराड यांच्या नावाला वंचित बहुजन आघाडीने पाठींबा दिल्यामुळे या जागेवर राष्ट्रवादीने दुसऱ्या यादीतही उमेदवार दिला नसल्याचे समजते.

यामुळे नाराज झालेल्या अपूर्व हिरे यांनी एबी फॉर्म नसताना आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, याबाबत आपण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटणार असल्याचे हिरे याप्रसंगी म्हणाले.

ते लवकरच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तसेच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि मुंबईत शरद पवार यांची भेट घेणार असून याबाबत आपली नाराजी व्यक्त करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

अपूर्व हिरे यांच्या नाराजीमुळे पश्चिम मतदार संघात काल झालेल्या शिवसेना भाजपच्या बंडाळी नंतर राष्ट्रवादीतही अशा प्रकारची घटना घडल्यामुळे नाशिक शहरात पश्चिमची निवडणूक अधिक प्रतिष्ठेची आणि चुरशीची होणार आहे.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!