ग्रॅस्ट्रोच्या साथीने राहुडेतील आणखी दोघांचा मृत्यू

0

नाशिक (प्रतिनिधी) ता. ११ : सुरगाणा तालुक्यातील राहुडे गावातील आणखी दोघांचा आज गॅस्ट्रोच्या साथीने मृत्यू झाला असून या गावात गॅस्ट्रोने मृत्यू पावलेल्यांची एकूण संख्या ३ झाली आहे.

यबशिरा लिलके आणि सीताराम पिठे अशी आज मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते.

या प्रकरणानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटीस बजावत या संपूर्ण घटनेचा तातडीने अहवाल मागविला आहे.

दोन दिवसांपूर्वी याच गावातील नामदेव गांगुर्डे या ज्येष्ठ नागरिकाचा गॅस्ट्रोने मृत्यू झाला होता. या प्रकारानंतर या गावातील आरोग्याविषयीची हेळसांड चव्हाट्यावर आली असून त्यानंतर यंत्रणा काल दिवसभर या गावात पोहचून उपचार करत होती.

दरम्यान कळवण तालुक्यात मंगला जाधव यांचा गॅस्ट्रोसदृश्य आजाराने आज मृत्यू झाल्याचे समजते.

LEAVE A REPLY

*