Gallery : नाशिक बंदची छायाचित्रे: या सेवा सुरू; या आहेत बंद

0

नाशिक (प्रतिनिधी) ता. ३

नाशिक बंदचा परिणाम १० नंतर जाणवायला लागला असून शालीमार, शिवाजी नगर, नेहरू गार्डन परिसराला पोलिसांच्या छावणीचे रूप आले आहे. याठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मेनरोड, मुंदडा मार्केट परिसरातील काही दुकाने सुरू आहेत. महात्मा गांधी रोड, रविवार कारंजा, दहीपूल, पंचवटी परिसरातही काही दुकाने सुरू आहेत. अनेक भागात आवाहनानंतर दुकाने आस्थापने बंद करण्यात येत आहेत.

शालीमार, अशोकस्तंभ, सीबीएस, रविवार कारंजा याठिकाणाहून रिक्षा वाहतूक तुरळक प्रमाणात सुरू आहे. मात्र बसस्टँडवर शुकशुकाट आहे.

या सेवा आणि आस्थापने बंद आहेत

निमाणी बस स्टँड व इतर सर्व शहर बसचे स्थानक; एसटी बस सेवा, खासगी शाळा, खासगी कार्यालये, कपडे, मोबाईल, सराफी दुकाने व इतर विविध दुकाने आणि आस्थापने, भाजीबाजार, फळबाजार, खासगी ट्रान्सपोर्ट सेवा.

नाशिक आगारातून शहर तसेच बाहेर जाणार्‍या लांबपल्ल्याच्या सर्व एसटी बस रद्द

सकाळी ११ वा. या सेवा सुरू होत्या.

मेडिकल स्टोअर्स, खाद्यपदार्थांची दुकाने, चहा-कॉफीचे आणि नाष्ट्याचे स्टॉल्स, रुग्णालये, दवाखाने, रिक्षा वाहतूक, एटीएम , काही खासगी बँका बंद आहेत.

LEAVE A REPLY

*