Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

नोकरी सोडून २० वर्षे जुन्या स्कूटरने ‘तो’ निघाला आईसह देशाटनाला; आनंद महिंद्रांनी केली कार गिफ्ट

Share

मुंबई | वृत्तसंस्था 

नियमित कुठल्या ना कुठल्या सामाजिक कामात हातभार लावून प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा चर्चेत येत असतात. आज पुन्हा एकदा त्यांनी ट्विटरवर एक घोषणा करून देशातील सर्वांचेच मनं जिंकली आहेत.

झाले असे की, महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी अशा सद्गृहस्थाची मदत करण्याची घोषणा केली आहे जो, २० वर्षे जुन्या स्कूटरवर आपल्या आईला संपूर्ण देशात फिरवत आहे.

आनंद महिंद्रा यांना ही गोष्ट समजल्यानंतर त्यांनी या तरुणास महिंद्राची KUV 100 NXT कार गिफ्ट करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. महिंद्रा यांनी एका व्हिडीओला रीट्वीट करत मदतीची इच्छा व्यक्त केली. यावेळी यात ते म्हणतात, या व्यक्तीने केवळ आईचे प्रेमच दाखवले नाही तर देशाप्रती असलेली प्रेमभावनादेखील दाखवून दिली आहे. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की, हा सद्गृहस्थ पुढल्या वेळी आपल्या आईला कारमधून देशाचे दर्शन घडवेल.


काय आहे या सद्गृहस्थाची कथा?

कर्नाटकच्या म्हैसूर येथे राहणाऱ्या डी. कृष्ण कुमार यांनी आपल्या ७० वर्षे वय असलेल्या आईला  देशाटन करण्याचा निश्चय केला आहे. यासाठी यात्रेला सुरुवात झाली असून या यात्रेला कृष्ण कुमार यांनी  ‘मातृसेवा संकल्‍प यात्रा’ असे नाव दिले आहे.

गेल्या चार वर्षांपूर्वी डी. कृष्णकुमार यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांनतर कृष्णकुमार यांनी आपल्या आईला दुसऱ्या शहरांचे दर्शन करण्याबाबत विचारले, तेव्हा होकार आला.  त्यानंतर या व्यक्तीने आपल्या आईला सोबत घेऊन संपूर्ण देशातील वेगवेगळ्या शहरांची सफर घडविण्याचे ठरवले.

यासाठी त्यांनी आपल्या वडिलांनी दिलेल्या २० वर्षे जुन्या स्कूटरवरून ही यात्रा करण्याचे त्यांनी ठरवले असे ते सांगतात.  ते म्हणतात की, आम्ही तीन जण यात्रेवर जात आहोत, यामध्ये मी, माझी आई आणि माझ्या वडिलांची आठवण असलेली ही स्कूटर. ट्वीटच्या अनुशंघाने आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी कृष्णकुमार यांनी आपली नोकरीदेखील सोडली आहे.


महिंद्रा नेहमीच देतात मदतीचा हात 

आनंद महिंद्रा यांनी अनेकदा चांगले काम करणाऱ्या व्यक्तींना मदतीचा हात दिला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आनंद महिंद्रा यांनी  ‘इडली वाली दादी अम्मा’ला सोशल मीडियात शोधत या अम्माला व्यवसायात मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

तसेच मे २०१७ मध्ये त्यांनी एका ऑटोवाल्याला महिंद्रा स्कॉर्पियो गिफ्ट केले होते. डिसेंबर २०१७ मध्ये बोलेरो पर फूड आउटलेट चालवणाऱ्या महिलेला एका नवी बोलेरोदेखील गिफ्ट केली होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!