Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : नाशिक : शेतकऱ्यांना वेळीच अर्थसहाय्य न केल्यास बँकांवर कारवाई – कृषिमंत्री अनिल बोंडे

Share

नाशिक | प्रतिनिधी

शेतकऱ्यांना ज्या जिल्हा बँकांना शेती कर्ज देण्यास वा इतर कुठलील्याही कारणास्तव अडचणीत आणत असतील तर अशा बँकाविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

शेतकऱ्यांनी अधिकृत दुकानातूनच बियाणे खते पावती सह घ्यावे बियाण्यांची भेसळ करून विकणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात तक्रारी दाखल करून त्यांच्यावर सक्त कारवाई यापुढे करण्यात येणार आहे.

प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या पिकाचा विमा काढावा असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी केले आहे.  दिवंगत वसंतराव नाईक माजी मुख्यमंत्री यांच्या जयंती दिनानिमित्त कृषी दिन कार्यक्रमाचे आयोजन येथील जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात करण्यात आले होते.  त्यावेळी ते बोलत होते.

नामदार बोंडे म्हणाले की, शेतकऱ्यांना ज्या बँका शेती कर्ज देणार नाहीत तसेच काही अडचणी आणत असेल तर त्या विरोधात एफआयआर नोंदवावा अशा सूचना संबंधितांना शासनाच्या वतीने करण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे पुढेही राहणार असून शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट व्हावे शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊन त्याला सन्मान मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

 

याकामासाठी शासन पुरेपूर प्रयत्न करणार आहे. शेती शेतकऱ्यांनी शेती पूरक व्यवसाय करावा शेतकऱ्यांनी एकत्र यावे व शेती गट करणे आवश्यक आहे.  यासाठी मुख्यमंत्र्यांनी जे शेतकऱ्यांचे गट एकत्र येतील, त्यांना एक ते दहा कोटी रुपयांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

याचा फायदा शेतकऱ्यांना घेऊन शेततळे  बांधून शेती करावी असे आवाहनही त्यांनी केले. कृषी सहाय्यकास ग्रामपंचायतीत हक्काचे कार्यालय मिळावे अशी सोय शासन करून देणार आहे.

यासाठी कृषी सहायकांची मोबाईलवर हजेरी घेतली जाणार आहे.  प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतमालाचा शेत पिकाचा विमा काढावा यासाठी विमा कंपन्यांचे एजंट जिल्हा अधिक्षक कार्यालयात बसणार असून तालुक्याच्या ठिकाणी कृषी कार्यालयात बसेल अशी व्यवस्था यापुढे केली जाणार आहे.

जे व्यापारी भेसळयुक्त बियाणी विकतील अशांवर सक्त कारवाई करून त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात येणार आहे.  वेळप्रसंगी त्यांना अटकही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे,  उपाध्यक्ष तथा कृषी सभापती नयना गावित, सभापती मनिषा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी सुरज मांढरे,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर नरेश गीते तसेच कृषी खात्याचे अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!