आरक्षणासाठी धनगर समाजाचा ठिय्या

0

मनमाड(प्रतिनिधी): राज्यातील धनगर समाजाला एस.टी चे आरक्षण मिळावे आणि त्याची अमलबजावणी करण्यात यावी,  सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर नाव देण्यात यावे यासह या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने आज पुणे -इंदोर राज्य महामार्गावर मनमाड जवळील कानडगाव येथे रास्ता रोको करण्यात आला.

यावेळी मेंढ़या, घोडे व बि-हाड़ासह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . यावेळी शासना विरोधात विविध घोषणा देत आरक्षणची मागणी करण्यात आली.

सुमारे एक तास चालेलेल्या रास्ता रोको मुळे महामार्गावरची वाहतूक ठप्प होवून वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आमच्या मागण्या लवकर मान्य नझाल्यास या पुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलन कर्त्यांनी सरकारला दिला.

 

LEAVE A REPLY

*