Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पॅरनॉड कंपनीविरोधात उपोषणकर्त्या तिघांची प्रकृती खालावली; प्रशासनाचे दुर्लक्ष, तीव्र संताप

Share

दिंडोरी | प्रतिनिधी 

देशातील सर्वात मोठी मद्यकंपनी म्हणून नावलौकिक असलेल्या दिंडोरी तालूक्यातील कांदवा म्हाळुंगी येथील परनॉड रिकार्ड कंपनीतील प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे अनेक कामगारांच्या नोकरीवर गदा आली आहे.

कंपनीने अचानक काही कामगारांची इतर राज्यात बदली केली. कामगारांनी बदली रद्द व्हावी यासाठी कंपनी प्रशासनाविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. गेल्या दोन दिवसांपासून कामगार आमरण उपोषणाला बसले आहेत.

आज आंदोलनाचा तिसरा दिवस. तिघा कामगारांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिंडोरीतील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मात्र, कंपनीच्या गलथान आणि मनमानी करणाऱ्या कारभाऱ्यांनी या कामगारांची दखलदेखील घेतली नाही त्यामुळे कंपनीविरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

परिसरातील अनेक कामगार याठिकाणी उदरनिर्वाहासाठी काम करतात. कंपनीत काम करून घरचा धंदाही बघता येतो म्हणून पगार कमी जरी असला तरी भागून जाते असे एका कामगाराने देशदूतशी बोलताना सांगितले.परंतु बाहेरील राज्यात काहीही कारण नसताना बदली केल्यामुळे या कामगारांच्या नोकरीवर गदा आली आहे.

कंपनीच्या मनमानी कारभारामुळे कंपनीने कामगारांची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. स्थानिक आमदार नरहरी झिरवाळ, राष्ट्रवादी नेते धनराज महाले यांनी काल आंदोलनस्थळी भेट देत कामगारांना पाठींबा दर्शिवला होता.

आज जेव्हा तिघांची प्रकृती खालावली, त्यानंतर कंपनी प्रशासनाला तहसीलदार गाढवे यांनी विचारणा केली. खडबडून जागे झालेल्या ढिम्म प्रशासनाकढून अखेर व्यवस्थापक देशमुख तहसीलदारांसोबत चर्चा करण्यासाठी पोहोचले असून लवकरच या प्रकरणावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

न्याय मिळेपर्यंत पाण्याचा घोट घेणार नाही

परनाँड रिकार्ड इंडिया विरोधात उपोषण करणाऱ्या तीन कामगारांची प्रकृती खालावली आहे. तर एका कामगारांची स्थिती गंभीर असल्याचे बोलले जात आहे. यापैकी सरला वाघ, ज्ञानेश्वर निकम, पंडीत सहाळे, स्वाती पगार या कामगारांनी उपचारासाठी नकार दिला असून जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही पाण्याचा एक घोटही पिणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने कंपनीविरोधात अधिकच संताप व्यक्त होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!