Friday, April 26, 2024
Homeनाशिक‘नागरिकत्व’ विरुध्द रविवारी नाशिकमध्ये मुस्लिमांचा एल्गार

‘नागरिकत्व’ विरुध्द रविवारी नाशिकमध्ये मुस्लिमांचा एल्गार

file photo

जुने नाशिक | प्रतिनिधी

- Advertisement -

नाशिक मरकजी सुन्नी सिरत कमिटीच्या वतीने उद्या (दि.२२) केंद्र सरकारच्या नागरिक्ता कायद्याविरुध्द आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी ११ वा. गोल्फ क्लब ईदगाह मैदानावर हे आंदोलन होणार असून सर्व संविधान प्रेमी नागरिकांनी सामील होण्याचे आवाहन खतीब-ए-नाशिक हाफीज हिसामुद्दीन अशरफी व मौलानांनी केले आहे.

संपूर्ण आंदोलन शांततेत होणार असून केंद्र सरकाराने आणलेल्या नागरिक्ता कायद्याला विरोध करण्यासाठी आपला आवाज बुलंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नाशिक मधील मुस्लिम बांधवांच्या वतीने केंद्र सरकारच्या एनआरसी कायद्याविरोधात आंदोलन होत आहे. देशभरात याबद्दल आंदोलन होत आहे.

नाशिकचे आंदोलन मध्येही सर्व संविधान प्रेमी नागरिकांनी सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे मुस्लिम समाजाचे समाजातील उलेमा व मान्यवर यांच्यावतीने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी ११ वाजता आंदोलन होणार आहे. यानंतर शिष्टमंडळ जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यासाठी जातील. नागरिकांनी आंदोलनात येताना व परत जाताना शांतता राखावी कोणालाही त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाला संपूर्णपणे सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

वाहतुकीत बदल

आंदोलनाच्या पार्श्‍वभुमीवर शहर पोलीस दलाच्या वतीने पोलीस उपायुक्त (वाहतुक) पौर्णिमा चौघुले-श्रींगी यांनी विशेष अधिसुचना जाहीर करुन वाहतुकीत बदल जाहीर केले आहे. मोडक सिग्नल ते मायको सर्कल व गडकरी चौक ते चांडक सर्कल या दरम्या सर्वपकारच्या वाहनांसाठी बंदी घालण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या