Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

हरसुल : पंधरा वर्षानंतर गावठा गावात आली ‘लालपरी’

Share

हरसुल । वार्ताहर

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गावठा येथे पंधरा वर्षांनंतर ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळे बससेवा सुरू झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

गावठा येथे पंधरा वर्षापूर्वी मुक्कामी बससेवा सुरू करण्यात आली होती, मात्र ग्रामस्थांना पूर्व कल्पना न देता ती बंद करण्यात आली होती. बससाठी ग्रामस्थांनी नाशिक येथील परिवहन अधिकार्‍यांकडे सतत पाठपुरावा केल्याने ही बस सकाळ, दुपार आणि रात्री मुक्कामी धावत आहे.

त्यात नाशिक – हरसूल- गावठा, गावठा- हरसूल-त्र्यंबकेश्वर-कसारा आदी मार्गाचा समावेश करण्यात आला आहे. याप्रसंगी बसचालक, वाहक यांचा ग्रामस्थांनी सत्कार केला. यावेळी पोलीस पाटील नारायण लहारे, अशोक लहारे, दिनेश लहारे, दत्तू लहारे, लक्ष्मण लहारे, भास्कर चौधरी, किसन आंबेकर, धर्मराज मौळे, नामदेव आंबेकर, काशीनाथ लहारे, लक्ष्मण लांघे, भाऊराज लहारे व ग्रामस्थ उपस्थित होते.

महामंडळ अधिकार्‍यांचे आभार

बससेवा सुरू झाल्याने दळणवळण सोयीचे झाले आहे. अनेक दिवसांच्या आम्हा पाठपुराव्यामुळे गावात बस आली. यामुळे अनेक गावांतर्गत प्रवाशांना सोयीचे झाले आहे. एसटी महामंडळ अधिकार्‍यांचे आभारी आहोत.

-दिनेश लहारे, सामाजिक कार्यकर्ते, गावठा

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!