Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

ओझर पोलिसांनी घडवली अवघ्या चोवीस तासांत दिव्यांग महिलेची नातेवाईकांशी भेट

Share
ओझर | वार्ताहर
ओझरचे  पोलिस निरिक्षक भगवान मथुरे यांनी अहमदनगर येथील हरवलेली महिलेची तिच्या घरच्यांशी भेट घडवून आणत तिला तिच्या मुलाच्या स्वाधिन केले. काल (दि.१०) ओझर बस स्थानक ते पोलीस चौकी परिसरात येरझरा घालताना एका महिला आढळून आली.
तिचे वय ५० ते ५५ वर्षे असेल. महिला बोलताना दिव्यांग (गतीमंद) असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. महिलेला येथील समाजसेवक शब्बीर खाटीक यांनी बघितल्यानंतर ती चांगल्या घरची असल्याचे लक्षात आले.
त्यांनी तिला चहापान देऊन चौकशी केली ती  असल्याचे प्रारंभीच त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ओझर पोलीसांशी संपर्क साधून  तिला पोलीस ठाण्यात नेले.
पोलीस निरिक्षक भगवान मथूरे यांनी सदर महिलेला विश्वासात घेवून चौकशी केली. तिचे नांव शारदा शिवाजी सांबरे (रा. वंजारवाडी ता अहमदनगर जि अहमदनगर) येथील असल्याचे समजले.
त्यांनी नगर पोलीस ठाण्याशी संपर्क करून हरवलेल्या शारदा सांबरे यांचा मुलगा संतोष शिवाजी सांबरे यांचा शोध घेऊन फोन नंबर मिळवला.
त्यास महिलेबाबत माहिती दिली. संतोष सांबरे यांस ओझर येथे बोलावून घेतले व त्यास योग्य ती समज दिली. हरवलेल्या शारदा सांबरे हिला त्यांचा मुलगा संतोष सांबरे यांच्या हवाली करून मातृसेवेचा सल्ला दिला.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!