Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

अटीतटीच्या ‘कुस्ती’त ढिकलेच पैलवान; बाळासाहेब सानप पराभूत

Share

नाशिक । प्रतिनिधी

विधानसभा निवडणूकीसाठी भाजपाने नाशिक पूर्व मतदार संघासाठी अखेरच्या क्षणी पक्षाचे विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांचा पत्ता कट करून अ‍ॅड. राहुल ढिकले यांना उमेदवारी दिली. एका रात्रीत पक्ष बदललेल्या ढिकले यांना मतदारांनीही स्विकारत नाशिक पूर्वच्या आमदारकीची माळ गळ्यात टाकली. अटीतटीच्या या सामन्यात ढिकले यांचे प्रतिस्पर्धी बाळासाहेब सानप यांना दारूण पराभव स्विकारावा लागला असून ढिकले हे तेवीसाव्या फेरी अखेर बारा हजारांचे मताधिक्क्य घेऊन विजयी झाले आहेत.

नाशिक पूर्व मतदार संघाच्या विधानसभा निवडणूकीची मतमोजणी गुरूवारी (दि. 24) पचवटीतील मीनाताई ठाकरे सभागृहात पार पडली. सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या मतमोजणीत पहिल्या फेरीपासून भाजपचे उमेदवार ढिकले आघाडीवर राहिले. 23 फेर्‍यांमध्ये राहुल ढिकले यांच्या पारड्यात मतांंचा जोगवा वाढत गेला. मात्र बाळासाहेब सानप समर्थक व कवाडे गटाचे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार गणेश उन्हवणे यांच्या समर्थकांनी नवव्या फेरीदरम्यान इव्हीएम मशिन व तत्सम बाबींबर आक्षेप घेतले.

त्यावर मतमोजणी आधिकार्‍यांनी लेखी स्वरूपात म्हणणे मांडण्यास सांगितले. त्यानुसार सानप समर्थक आणि उन्हवणे यांंनी यंत्रणेकडून ‘इव्हीएम मशीन’ सील करतेवेळी पोलींग एजंटच्या सह्या घेतलेल्या नाही यासह अन्य बाबींबर लेखी निवेदन सादर केले. त्यावर निवडणूक निरीक्षक आणि निवडणूक निर्णय आधिकार्‍यांनी चर्चा करून सर्वांसमक्ष वस्तुस्थिती स्पष्ट करत आक्षेपाचे अर्ज फेटाळून लावले, मात्र या एकूणच सावळ्या गोंधळामुळे मतमोजणी केंद्रात तणाव निर्माण झाला होता.

अखेर सहाय्यक पोलीस आयुक्त अनिरुद्ध आढाव व अन्य पोलीस आधिकार्‍यांनी केंद्रात दाखल होत गोंधळ थांबविला. निवडणूक निर्णय आधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांनी वरीष्ठांचे मार्गदर्शन मागवून आलेले आक्षेप फेटाळून लावले. मात्र शेवटच्या क्षणी उन्हवणे यांनी मतमोजणी व इव्हीएम मशीनवर संशय व्यक्त करून या मतमोजणीवर बहिष्कार टाकून केंद्रातून काढता पाय घेतला.

जिल्ह्यातील 15 विधानसभा निवडणूकांंंच्या निकालापैकी शेवटचे निकाल सायंकाळी सहा वाजेपर्यंत जाहिर झाले, मात्र पूर्व मतदार संघात मतमोजणीसाठी कार्यरत प्रशासकीय व्यवस्था ढिम्म असल्याने सर्वात शेवटचा निकाल हा पूर्व मतदार संघाचा लागला. ढिकले यांच्या विजयाचीे घोषणा करण्यासाठी आधिकार्‍यांना रात्रीचे आठ उजाडले. या उलट अनेकदा मतमोजणी बंद पाडल्याने निकाल जाहीर होण्यास बराच अवधी लागला.


दोनदा बंद पाडली मतमोजणी

सानप समर्थक आणि गणेश उन्हवणे समर्थक यांनी विविध कारणांतून मतमोजणीवर आक्षेप नोंदविले. त्यामुळे जवळपास दोन ते तीन वेळेस मतमोजणी कार्यकर्त्यांनी बंद पाडली. काहीकाळ येथे तणाव निर्माण झाला होता.


ढिकले समर्थकांचाही आक्षेप

मतमोजणी केंद्रात केवळ उमेदवार किंवा त्याचा एक प्रतिनिधी थांबावा, असा पवित्रा ढिकले समर्थकांनी घेतला. त्यामुळे काहीकाळ वातावरण तापले होते. अखेर मतदान आधिकार्‍यांनी हस्तक्षेप करून वा़द मिटविला.


अ‍ॅड. ढिकले यांचा जल्लोष

सायंकाळी सात वाजता राहुल ढिकले यांनी मतमोजणी केंद्र गाठले. तेव्हा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेत जल्लोष साजरा केला. तसेच गुलालाची उधळण केली. यावेळी त्यांचे कुंटुंब व समर्थक उपस्थित होते.


ते दिग्गज नाहीत…

माझे वडील माजी खासदार उत्तमराव ढिकले यानी सन 2009 मध्ये बाळासाहेब सानप यांचा पराभव केला होता. यंदाच्या निवडणूकीत मी देखील सानप यांचा पराभव केला आहे. त्यामुऴ्के माझ्या दृष्टीने ते दिग्गज नाहीत. माझा विजय हा पक्ष, कार्यकर्ते व वडीलांमुळे झाला आहे.

नवनिर्वाचित आमदार राहुल ढिकले.


तेवीसाव्या फेरीअखेर मिळालेले मतदान

अ‍ॅड. ढिकले 84 हजार 893,  बाळासाहेब सानप 72 हजार 728

एकूंण मतदान 1 लाख 77 हजार 733

मतांची आघाडी – 11932

एकूण पोस्टल मतदान-1084.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!