Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मुलींच्या प्रवेशासाठी मुदतवाढ

Share
नाशिक | प्रतिनिधी
शहरातील मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ( आयटीआय) मध्ये डिजिटल फोटोग्राफी   व अन्य व्यावसायिक प्रशिक्षणासाठी प्रवेशाची मुदत वाढविण्यात आली आहे. शासनाकडून मुदतवाढ देण्यात आल्यामुळे जास्तीत जास्त मुलींनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन प्राचार्य एम. डी. भामरे यांनी केले आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सामान्य परिस्थितीतील महिलांना अनेक व्यावसायिक  अभ्यासक्रम अत्यंत नाममात्र शुल्कात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
राज्यातील शासकीय आयटीआय मध्ये प्रवेश सत्र ऑगस्ट 2019 करिता ज्या उमेदवारांनी अर्ज भरलेला नाही किंवा ज्यांना प्रवेश मिळाला नाही अशा उमेदवारांना पुन्हा एकदा प्रवेश निश्चिती करता येणार आहे. यासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा अशी माहिती प्राचार्या भामरे  यांनी केली आहे.
अशी असेल प्रक्रिया
  • नव्याने अर्ज भरणे आणि भरलेला अर्ज निश्चित करणे : दिनांक ०४ ते ११ सप्टेंबर २०१९
  • नव्याने अर्ज केलेले व अ प्रवेशित राज्यस्तरीय एकत्रित गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे : १२ सप्टेंबर २०१९
  • नव्याने अर्ज केलेले व यापूर्वी अर्ज केलेले परंतू प्रवेश न मिळालेल्या अशा सर्व उमेदवारांनी शासकीय संस्थेत नाव नोंदणी करणे व नोंदणीकृत उमेदवारांची संस्था स्तरावर यादी प्रसिद्ध करणे : १३ सप्टेंबर २०१९ आणि ०१ सप्टेंबर २०१९  रोजी नोंदणीकृत उमेदवारांना संस्था स्तरावर प्रवेशासाठी जागा करून देणे अलॉटमेंट आणि त्यादिवशी प्रवेशासाठी कारवाई करण्यात येईल.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!