Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

आडगाव पोलीस ठाण्यात ‘फ्री-स्टाईल’ हाणामारी

Share

नाशिक । प्रतिनिधी 

आपल्या विरूद्ध तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेचा अंगठ्याचा लचका तोडून एका कुटुंबाने जबर मारहाण करीत जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना आडगाव पोलीस ठाण्यातच घडली.

छाया नाडे (रा. शिवमुद्रा चौक, नांदूर लिंक रोड, नाशिक) या बहिण माया खडसे यांच्यासोबत (29) रात्री साडेदहा वाजता आडगाव पोलीस ठाण्यात संशयित पुजा प्रल्हाद धुमाळ, प्रल्हाद धुमाळ, साक्षी, वैष्णवी व ओम धुमाळ यांंनी केलेल्या मारहाणीची तकार देण्यासाठी आल्या होत्या.

याचवेळी धुमाळ कुटुंबाने छाया नाडे यांना पकडून मारहाण केली. तसेच पुजा धुमाळ हिने छाया यांचा डावा अंगठा चावून त्याचा तुकडा पाडला.

या संशयितांनी छाया व त्यांच्या बहिणीस जातीवाचक हिनवून धमकी दिली. याबाबत संशयित कुटुंबावर बेकायदेशीर जमाव, हाणामारी व अ‍ॅट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक आयुक्त प्रदीप जाधव करीत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!