Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : अभिनेत्री चित्रा कुलकर्णीला ‘शिवशाही’च्या भोंगळ कारभाराचा मनस्ताप

Share

जानोरी | वार्ताहर

महाराष्ट्र  राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांचा प्रवास सुखकर व आरामदायी व्हावी व आपल्याकडे जास्तीत जास्त प्रवासी आकर्षित व्हावेत यासाठी शिवशाही बससेवा सुरु केली. परवडेल अशा दरात स्लीपर बसेसही सध्या धावत आहेत. मात्र राज्य परिवहनचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. चालक उपलब्ध नसल्याने गाडीला निघण्यास तब्बल तासभर उशीर झाला तर सुखकर प्रवासालाही मुकावे लागल्याने नाशिकच्या अभिनेत्री चित्रा कुलकर्णीला मनस्ताप सहन करवा लागला.

नाशिकहून कोल्हापूरसाठी स्लीपर शिवशाही बस जाते. अभिनेत्री चित्रा कुलकर्णी हिने नाशिकहून कोल्हापूरला जाण्यासाठी शिवशाही बसचा पर्याय निवडला. त्यानुसार बसचे दोन्ही बाजूने आरक्षण करून घेतले. त्यानंतर त्यांना शिवशाहीतून प्रवास करण्याचा वाईट अनुभव आला.

त्या म्हणाल्या की, मला सिनेमाच्या बोलणीबाबत महत्त्वपुर्ण बैठकीसाठी मंगळवारी (दि.२४) कोल्हापूर येथे जावयाचे होते.

त्यामुळे मी नाशिकहून सोमवारी (दि.२३) रात्रीच कोल्हापूरला रवाना होणे गरजेचे होते. यासाठी सुरक्षित व आरामदायी सेवा म्हणून त्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसने जाण्याचा निर्णय घेतला. यासाठी चौकशी केली असता त्यांना रात्री सव्वानऊ वाजेच्या शिवशाही बस कोल्हापूर जाण्यासाठी असल्याचे समजले.

त्यानूसार त्यांनी शिवशाही बसची जाण्याचे व येण्याचे दोन्ही बाजुचे तिकीट आरक्षित करून घेतले. त्यानुसार त्या़ रात्री कोल्हापूर जाण्यासाठी नाशिक बसस्थानकावर गेल्या.

तेथे कोल्हापूरला जाणारी बस उभी होती, परंतु त्याला चालकच उपलब्ध नसल्याची माहिती मिळताच त्याच्याबरोबर असलेल्या प्रवाशांसह त्यांची तारांबळ उडाली प्रवाशांची होणारी झालेली गैरसोय संबंधित विभागाच्या लक्षात आणून देवुन तात्काळ चालक उपलब्ध करून द्यावी अशी मागणी वारंवार प्रवाशांनी केली असता त्यानंतर सव्वा नऊला निघणारी शिवशाही साडेदहाच्या सुमारास कोल्हापूरला रवाना झाली.

जाण्यासाठी खुप आटापिटा करावे लागल्याने त्यांना परत येताना शिवशाहीने न येता खाजगी ट्रँव्हल्सने येणेच पसंत केले. त्यामुळे त्यांनी सदर आरक्षित तिकीट रद्द करण्यासाठी संबंधित विभागाशी संपर्क केला असता ५०% रक्कम रद्द करण्याची अजब नियम दाखविला.

प्रवाशांची गैरसोय करून वरून प्रवाशांनाच अर्थिक भुर्दंड देण्याचा अजब कारभार परिवहन महामंडळाकडून होत असून यावर प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

परिवहन महामंडाळाकडून आपल्याला सुरक्षित प्रवास होईल या अपेक्षेने विशेषतः महिला वर्ग निसंकोचपणे प्रवास करतात. परंतु परिवहन महामंडळाने पुरेपुर सोय न करता वरून प्रवाशांनाच अर्थिक दंड देण्याचा हा नियम नक्कीच संताप व्यक्त करणारा असून संबंधित महामंडळाच्या अधिकारी यांनी तात्काळ दखल घेवून प्रवाशांना संताप होईल अशी सेवा न देता सुखकर होईल अशी सेवा द्यावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.


 

प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर हे ब्रीदवाक्य घेवून चालणारी परिवहन महामार्ग प्रवाशांसाठी संतापजनक ठरत आहे हे नक्कीच खेदजनकच म्हणावे लागेल. सेवा पुरेपुर देता असेल तरच सेवा चालू करावी अन्यथा देखावा बंद करावे. चुकीची सेवा देवून वरून प्रवाशांनाच अर्थिक दंड वसूल केला जातो ही संतापजनकच आहे, तरी परिवहन महामंडळ विभागाने आपले ब्रीदवाक्याला शोभेल अशी सेवा द्यावी हीच अपेक्षा व्यक्त करते.

चित्रा रविंद्र कुलकर्णी, सिनेअभिनेत्री

 

 


 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!