Type to search

Breaking News आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या हिट-चाट

‘अश्रुंची झाली फूले’ जगातील मराठी रसिकांपर्यंत पोहचवू

Share

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक नगरीचे नाटकरकार प्रा. वसंत कानेटकरांचे प्रत्येक नाटक माणूस आणि त्याच्याशी निगडीत गोष्टीवर आधारीत आहेत. त्यामुळे त्याकाळी लिहलेली नाटके कधीही शिळी किंवा तत्कालिन न वाटता आजच्या काळातही ताजी व समकालिन वाटतात. प्रा. कानेटकरांनी लिहलेले ‘अश्रुंची झाली फूले’ ही सर्वार्थाने अप्रतिम कलाकृती असून जगाच्या पाठीवर जिथे मराठी माणूस असेल तिथपर्यंत हे नाटक पोहचवण्याचा एक सहनिर्माता आणि अभिनेता म्हणून माझा प्रयत्न राहील, असे लाल्याची भूमिका करणारे अभिनेता सुबोध भावे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

सहा वर्षांनंतर मी रंगभूमीवर परतलोय. प्रा. कानेटकरांचे अश्रुंची झाले फुले करताना आनंद होत आहे. व्यावसायिक नाटकात वैविध्यपूर्ण विषय आशय आणणारे ते महान नाटककार होते त्यांनी लिहलेले नाटक जिथे मराठी माणूस आहे. तिथपर्यंत पोहचवून त्यांना आदरांंजली वाहणार आहे.

प्रेक्षक आणि कलावंत यांच्यातील संवाद गेल्या काही वर्षात कमी झाला असून हा संवाद पुन्हा अश्रुंची झालीफुले या नाटकातून वाढवणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हात एक याप्रमाणे एकूण 50 हून अधिक प्रयोग करणार असल्याचे ते म्हणाले.

शरद पवारांची भूमिका

शरद पवार राजकारणातील अत्यंत मुरब्बी व्यक्तीमत्त्व असून त्याच्या मनात काय सुरू याचा कुणालही थांगपत्ता लागत नाही. अशा राजकीय पुढार्‍याची भूमिका आव्हानात्मक असते. त्याच्यावर बायोपिक आला तर त्यामध्ये शरद पवारांची भूमिका पडद्यावर रंगवण्यास मी उत्सुक आहे, असे सुबोध भावे यांनी सांगितले.

नाट्यगृहे हौशी कलाकरांना द्यावी

नाट्यगृहे नाटकासाठी असतात. त्यात इतर कार्यक्रमांना परवाणगी देऊ नये. हौशी नाट्यसंस्था आणि कलावंताना माफक दरात नाट्यगृह उपलब्ध करुन दिली पाहिजे. शासनाने व्यावसायिक कलाकरांना रेल्वे, बस प्रवासात सूट तसेच कलाकार, नाट्यसंस्थांच्या वाहनांना टोलफ्री देऊन नाटकाला प्रोत्साहन द्यावे अशी अपेक्षा भावे यांनी व्यक्त केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!